Udayanraje Bhosale : उदयनराजेंसह वारसांना जमीन महसुलात सूट
esakal January 12, 2025 07:45 AM

सातारा - स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रेरणादायी असून, त्यांच्याप्रती आदरभाव राखत राज्य शासनाने त्यांच्या वारसांना घराण्याच्या खासगी जमिनी व इतर मालमत्तांना महसुलातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट तहहयात सुरू ठेवण्यासही शासनाने मान्यता दिली आहे.

याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे महत्त्व लक्षात घेऊन घराण्याच्या खासगी जमिनी व इतर मालमत्तांसंदर्भात वेळोवेळी शासन आदेश काढून महसुलात सूट देण्यात आली आहे. पहिल्यांदा १९५३ मध्ये श्रीमंत शाहू प्रतापसिंहराजे भोसले यांना महसुलात सूट देण्यात आली होती.

त्यांच्या निधनानंतर श्रीमंत प्रतापसिंहमहाराज शाहूमहाराज भोसले यांना १९५७ च्या शासन निर्णयानुसार सूट देण्यात आली. त्यानंतर १९८० च्या निर्णयानुसार ही सूट उदयनराजे भोसले यांना देण्यात आली होती. आता नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार खासदार उदयनराजे यांच्या हयातीसह वंशपरंपरेने त्यांच्या लिनीयल वारसांना (रक्ताच्या) तहहयात सूट देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.