Ajit Pawar and Supriya Sule attend a program in Anjangaon Baramati rrp
Marathi January 12, 2025 02:25 AM


निवडणुकीतील राजकीय लढाईनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकमेकांशी बोलताना दिसत नाहीत. तसेच हे दोघेही एकत्र एकाच व्यासपीठावर आलेले नाहीत. मात्र आज बारामतीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते.

बारामती : अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. तेव्हापासून पवार कुटुंबातही अंतर पडल्याचे पाहायला मिळत आहेत. इतकचं नाही तर निवडणुकीतील राजकीय लढाईनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकमेकांशी बोलताना दिसत नाहीत. तसेच हे दोघेही एकत्र एकाच व्यासपीठावर आलेले नाहीत. मात्र आज बारामतीत अजित पवार आणि सुप्रिया सुळे या एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. (Ajit Pawar and Supriya Sule attend a program in Anjangaon Baramati)

बारामती तालुक्यातील अंजनगावच्या वीज वितरण केंद्राच्या उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरून खासदार सुप्रिया सुळे या नाराज होत्या. त्यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री आणि ऊर्जा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून स्पष्ट केली होती. या भागाची मी लोकप्रतिनिधी असल्याने किमान 24 तास आधी निमंत्रण मिळायला हवे. आमचेही पूर्वनियोजित कार्यक्रम असतात. सार्वजनिक कार्यक्रमाच्या वेळी एखादा कार्यक्रम आयोजित करताना किमान 24 तास आधी कळवणे अत्यावश्यक आहे, याची नोंद घेण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. मात्र नाराज असतानाही सुप्रिया सुळे आज अंजनगावामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

– Advertisement –

हेही वाचा –  Manoj Jarange : सगळं पाप झाकण्यासाठी मुंडे ओबीसींचं पांघरून घेतायत; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

अजित पवार कार्यक्रमाला येण्याआधीच सुप्रिया सुळे या अंजलनागावात पोहचल्या होत्या. यानंतर काही काळ त्यांनी अजित पवार यांची प्रतिक्षा केली. अजित पवार कार्यक्रमस्थळी आल्यावर दोघांनीही एकमेकांना पाहून नमस्कार केला. अजित पवार यांनी रिबीन कापून वीज वितरण केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजवल्या. यानंतर सुप्रिया सुळे धाराशिवच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आणि अजित पवारांनी पुढील कार्यक्रमात आपल्या भाषणाला सुरुवात केल्याचे दिसून आले. मात्र या कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या अबोला कायम असल्याचे पाहायला मिळाले. कारण दोघांनी एकमेकांशी कोणत्याही प्रकारे संवाद साधला नाही.

– Advertisement –

हेही वाचा – Santosh Deshmukh Case : आरोपींना फाशी देण्याचे काम सरकारचे, देशमुख प्रकरणी खासदार निंबाळकर आक्रमक



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.