सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये एसए20 लीग सुरू आहे. त्यामध्ये आजचा दिवस खूप खास होता. खरेतर, आज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) या लीगमध्ये पदार्पण केले आहे. या लीगमध्ये पदार्पण करणारा कार्तिक पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. पदार्पणाच्या सामन्यातच कार्तिकच्या संघाने शानदार कामगिरी करत शानदार विजय मिळवला. एसए20 लीगमध्ये कार्तिक पार्ल रॉयल्सकडून खेळताना दिसला. कार्तिकला मैदानावर पाहून चाहते खूप आनंदी दिसत होते.
दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आज सनरायझर्स ईस्टर्न कॅपविरूद्ध पदार्पण केले. सामन्यादरम्यान दिनेश कार्तिक समालोचकाशी बोलताना दिसला. तो मैदानावर सामन्यादरम्यान म्हणाला, “ही एक नवीन सुरुवात असल्यासारखी आहे. आयपीएलनंतर, मला अशा प्रकारच्या आव्हानाचा आनंद घ्यायचा होता. एसए20चा दर्जा उत्कृष्ट आहे आणि मी त्याचा भाग होण्यास खूप उत्सुक आहे.”
पदार्पणाच्या सामन्यातच दिनेश कार्तिक यष्टीमागे चमत्कार करताना दिसला. त्याने ईस्टर्न कॅप्सविरूद्ध विकेटमागे एक महत्त्वाचा झेलही घेतला. मुजीब उर रहमानच्या गोलंदाजीवर कार्तिकने विस्फोटक फलंदाज जॅक क्रॉलीचा झेल घेतला. त्याने यष्टीमागे उत्तम कामगिरी केली.
दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आयपीएल 2024 नंतरच ही लीग सोडण्याचा निर्णय घेतला होता. कार्तिक आयपीएलमध्ये शेवटी आरसीबीकडून खेळताना दिसला. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो आरसीबीमध्ये प्रशिक्षकपदाची भूमिका साकारणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी रविंद्र जडेजाचे स्थान धोक्यात, माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा
आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड ठरल्यानंतर ‘या’ 3 दिग्गजांची दमदार कामगिरी
मोहम्मद शमी परतला, पंतला विश्रांती! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ