अक्षय ऊर्जेचे विक्रमी उत्पादन
Marathi January 12, 2025 09:25 AM

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतात 2024 मध्ये पुन्हा उयोगी ऊर्जानिर्मिती क्षमतेत (रिन्यूएबल एनर्जी) विक्रमी वाढ झाली आहे. 2024 मध्ये अशा प्रकारच्या ऊर्जा उत्पादन वाढीची क्षमता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून ती 30 गीगावॅटस् इतकी आहे. 2023 मध्ये ही वाढक्षमता केवळ 13.75 गीगावॅटस् इतकी होती. ती 2024 मध्ये 113 टक्के वाढून 30 गीगावॅटस् इतकी झाली आहे. भारताने 2030 पर्यंत 500 गीवावॅटसूची पुनउपयोगी ऊर्जा निर्मिती क्षमता साध्य करण्याचे ध्येय ठेवले आहे.

हे ध्येय प्राप्त करायचे असेल तर भारताला 2025 ते 2030 या सहा वर्षांच्या काळात प्रतिवर्ष या ऊर्जानिर्मितीची क्षमता 50 गीवावॅटस्ने वाढवावी लागणार आहे. सध्या भारताच्या वीजच्या एकंदर आवश्यकतेत पुन:पयोगी ऊर्जेचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, अशा प्रकारची ऊर्जानिर्मिती ही पर्यावरणस्नेही असल्याने ती प्रदूषणमुक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यकाळात याच प्रकारच्या ऊर्जानिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. अशी महिती देण्यात आली आहे. 2014 मध्ये देशाची पुनउ&पयोगी ऊर्जा क्षमता केवळ 35.8 गीगावॅटस् होती. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार स्थानापन्न झाल्यानंतर या क्षमतेत प्रत्येकवर्षी वाढ होत गेली. आता पुन्हाउपयोगी ऊर्जानिर्मिती क्षमता 200 गीगावॅटस् इतकी झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये या क्षमतेत सहा पटींपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळे 2030 पर्यंत 500 गीगावॅटस्चे ध्येय गाठणे शक्य झाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.