मुंबई : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयित असलेला मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. त्याच्यावर संतोष देशमुख याच्या हत्येप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसली तरी खंडणीच्या दुसऱ्या एका प्रकरणात वाल्मीक कराडला न्यायालयाने 14 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावणी आले. अशातच वाल्मीक कराडचा आणखी एक प्रताप समोर येत आहे. वाल्मीक कराडने अनुदानाच्या नावाखाली राज्यातील 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला आहे. (Walmik Karad duped 140 farmers of crores in the name of subsidy)
पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊस तोडणीचे काम करतात. वाल्मीक कराडने शेतकऱ्यांना कोट्यावधींना फसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, वाल्मीक कराडने आमच्या मशिनला प्रत्येकी 36 लाखांचे अनुदान मिळवून देतो असे सांगून त्याने मशीन मालकांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले. तसेच तत्कालीन कृषीमंत्री माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो, तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या, असेही वाल्मीक कराडने सांगितले असल्याचा आरोप दिलीप नागणे यांनी केला.
– Advertisement –
हेही वाचा – Manoj Jarange : सगळं पाप झाकण्यासाठी मुंडे ओबीसींचं पांघरून घेतायत; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
दिलीप नागणे म्हणाले की, वाल्मीक कराडवर विश्वास ठेवून सोलापूरसह राज्यातील 140 मशीन मालकांनी प्रत्येकी आठ लाख रुपये गोळा करून ते एका पोत्यात भरले आणि मुंबईतील विश्रामगृहात वाल्मीक कराडला दिले. मात्र, त्यानंतर आम्हाला कुठल्याच प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे आम्ही वाल्मीक कराडला फोन करून अनुदान मिळाले असल्याची तक्रार केली, तसेच आमचे पैसे परत द्या, अशी मागणी केली. त्यामुळे वाल्मीक कराडने आम्हाला सर्वांना बीडला बोलावले. आम्ही सर्व 140 मशीन मालकांनी बीडला जाऊन वाल्मीक कराडची भेट घेतली. यावेळी तुमचे कोणते पैसे आहेत? असा प्रश्न विचारता वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली, असा आरोपही नागणे यांनी केला.
– Advertisement –
दरम्यान, दिलीप नागणे म्हणाले की, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, सांगली या भागातील ऊस तोडणी यंत्र मालकांची वाल्मीक कराड याने फसवणूक केली आहे. वाल्मीक कराड यांच्या दहशतीमुळे आम्ही आतापर्यंत पोलिसात कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. पण आता त्याला अटक झाल्यामुळे 140 पैकी सोलपूर जिल्ह्यातील काही मशीन मालक तक्रार देण्यासाठी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात आलो आहोत, अशी माहिती दिलीप नागणे यांनी दिली.