'गेम चेंजर' (Game Changer) हा चित्रपट एस. शंकर दिग्दर्शित आहे. या चित्रपटात राम चरणसोबत बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी Kiara Advani ) देखील पाहायला मिळत आहे. 'गेम चेंजर' हा चित्रपट ॲक्शन-ड्रामा अन् रोमान्सचा धमाका आहे. 'गेम चेंजर' मध्ये राजकीय पार्श्वभूमी आहे. या चित्रपटात राम चरणने आयएएस अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारली आहे.
साऊथ अभिनेता ( Ram Charan) याचा 'गेम चेंजर'चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'गेम चेंजर'चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection Day 2) 51.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी 21.5 कोटींची कमाई आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
'' अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने एकूण 72.5 कोटी रुपये कमावले आहेत. संडेच्या कलेक्शन नंतर हा आकडा 100 कोटींच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 'गेम चेंजर' चित्रपट तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळ या पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 'गेम चेंजर'चित्रपटाने भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे.
'गेम चेंजर' चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची गाणी सुपरहिट ठरली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने 'गेम चेंजर' 'पुष्पा 2'ला टक्कर देणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शन मधील घसरणमुळे संडेला किती 'गेम चेंजर' कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.