Devendra Fadnavis said that we all have to work together to pacify Beed and Parbhani areas rrp
Marathi January 12, 2025 06:25 AM


शिर्डी येथे भाजपाने आज आणि उद्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी येथे गेले आहेत. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीड आणि परभणी भाग आपल्याला सर्वांना मिळून शांत करावा लागेल, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

नाशिक : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू आहे. शिर्डी येथे भाजपाने आज आणि उद्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन केले आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिर्डी येथे गेले आहेत. साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बीड आणि परभणी भाग आपल्याला सर्वांना मिळून शांत करावा लागेल, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. (Devendra Fadnavis said that we all have to work together to pacify Beed and Parbhani areas)

भाजपाच्या अधिवेशनाबद्दल प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी हे महत्त्वाच अधिवेशन आहे. आमचे राज्यातले सगळे कार्यकर्ते आणि जे पदाधिकारी आहेत, त्या सर्वांना या अधिवेशनात निमंत्रित केलं आहे. आम्ही त्यांचे आभार मानणार आहोत, त्यासोबत पुढची दिशा आम्ही त्यांना देणार आहोत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

– Advertisement –

हेही वाचा – Manoj Jarange : सगळं पाप झाकण्यासाठी मुंडे ओबीसींचं पांघरून घेतायत; मनोज जरांगेंचा हल्लाबोल

दरम्यान, परभणी आणि बीड हे दोन्ही भाग शांत करण्याची जबाबदारी एकट्या मुख्यमंत्र्यांची नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निश्चितच आपल्याला सर्वांना मिळनूच हा भाग शांत करावा लागेल. विशेषत: बीड जिल्ह्यामध्ये समाजात आपल्याला एक प्रकारे दुफळी पाहायला मिळत आहे. परभणीतही काही आंदोलन होत आहेत. त्या दृष्टीने सरकारचा प्रयत्न आहे की, हा सगळा भाग शांत झाला पाहिजे आणि जी काही दुफळी निर्माण झाली आहे ती दूर झाली पाहिजे. अर्थातच हे सर्व होत असताना जे आरोपी आहेत, त्यांना कडक शासन झालं पाहिजे, याबद्दल सरकार कटीबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

– Advertisement –

शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर चर्चा

दरम्यान, शरद पवार आज साहित्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मी याठिकाणी यायच्या आधी मुख्यमंत्र्यांशी बीड आणि परभणी येथील परिस्थितीबाबत फोनवरून चर्चा केली आहे. हा भाग शांत झाली पाहिजे, अशी मागणी केली  आहे. आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही. परंतु गेले काही दिवस अस्वस्थ वातावरण महाराष्ट्रात दिसत आहे. त्यामुळे बीड आणि परभणी कसं शांत करता येईल, हे आपण पाहिले पाहिजे. अशांत महाराष्ट्र असे चित्र राज्यात होऊ द्यायचे नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा – Supriya Sule : नगरपालिका हे कार्यकर्त्यांचे हक्काचे इलेक्शन, त्यामुळे…; राऊतांच्या विधानावर सुळेंचा टोला



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.