Nashik road Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात; ५ जण ठार, मृतांची नावे आली समोर
Saam TV January 13, 2025 01:45 PM

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik Accident update : नाशिकमध्ये भीषण अपघात घडलाय. नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर भीषण अपघात झालाय. नाशिकच्या या भीषण अपघातात ५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तसेच १० ते १२ जण लोक गंभीर जखमी झाले आहेत. तरुण वयोगटातील या तरुणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांची नावे समोर आली आहे.

नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर भीषण अपघात झाला आहे. या ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात १० ते १२ लोक गंभीर जखमी झाले आहेत. तर लोखंडी सळई घेऊन जाणऱ्या ट्रकला पिकअपची मागून धडक दिली. यानंतर झालेल्या भीषण अपघातात नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. उड्डाणपुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाणपुलावर हा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. अपघातानंतर गेल्या 30 मिनिटांपासून वाहतूक ठप्प झाली. या अपघातानंतर स्थानिक लोक, इतर वाहन चालक मदतीला धावले. या अपघातातील मृतांचे नावे देखील समोर आली आहे.

मृतांची नावे अशी...

१)अतुल संतोष मंडलिक (२२),

२) संतोष मंडलिक (५६),

३) यश खरात,

४) दर्शन घरटे,

५) चेतन पवार (१७)

जखमींची नावे अशी...

१) सार्थक (लकी) सोनवणे, २) प्रेम मोरे, ३) राहुल साबळे, ४) विद्यानंद कांबळे, ५) समीर गवई, ६) अरमान खान, ७) अनुज घरटे, ८) साई काळे, ९) मकरंद आहेर, १०) कृष्णा भगत, ११) शुभम डंगरे, १२) अभिषेक, १३) लोकेश

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.