Rohit Sharma : कॅप्टन रोहित शर्माचा चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा निर्णय
GH News January 14, 2025 11:09 PM

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याची बॅट गेल्या काही महिन्यांपासून शांत आहे. रोहितला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहित नुकत्याच झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत पूर्णपणे अपयशी ठरला. तसेच रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका गमावली. एकूण रोहित या मालिकेत एक फलंदा आणि कर्णधार म्हणून अपयशी ठरला. त्यामुळे रोहितवर चौफेर टीका करण्यात आली. रोहितने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होऊन प्रतिक्षेत असलेल्या खेळाडूंसाठी जागा रिकामी करावी, असं नेटकऱ्यांकडून म्हटलं जात होतं. मात्र या सर्व चर्चेदरम्यान आणि आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रोहितने मोठा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया भारत दौऱ्यानंतर मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. अशात कर्णधार रोहित 8 वर्षांनंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक करणार आहे. रोहितने मुंबई टीमसह सराव करण्याचा निर्णय घेतला.

बीसीसीआयचे आदेश

दरम्यान बीसीसीआयने कॅप्ड खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचे आदेश दिलेले आहेत. देशासाठी खेळत असताना आणि आरोग्य या 2 कारणांमुळेच कॅप्ड खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमधून सूट आहे. विजय हजारे ट्रॉफीनंतर रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई टीम या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात जम्मू-काश्मीरविरुद्ध भिडणार आहे. हा सामना 23 जानेवारी रोजी मुंबईतील शरद पवार क्रिकेट एकादमीत खेळवण्यात येणार आहे.

टीमसोबत सराव

रोहितने मुंबई टीमसह सराव केला. रोहितसोबत अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे देखील होते. टीओयनुसार, रोहित जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळण्यासाठी इच्छूक आहे. सर्फराज खान याला दुखापत असल्याने तो या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे रोहित 23 तारखेला प्लेइंग ईलेव्हनचा भाग असणार का? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

रोहित शर्माचा सराव, पाहा व्हीडिओ

बीजीटीमध्ये निराशाजनक कामगिरी

दरम्यान रोहितला बीजीटीमध्ये आपली जादू दाखवता आली नाही. रोहितने 5 पैकी खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये काहीच करता आलं नाही. मात्र रोहित यातून खचून न जाता आता पुन्हा एकदा कमबॅकसाठी तयार झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.