मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Marathi January 14, 2025 11:26 PM

बीड : जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असून याप्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी 1 वगळता सर्वच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्‍यांनी विधिमंडळात जाहीर केल्यानुसार आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, याप्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप झालेल्या वाल्मिक कराडवर (Walmik karad) अद्यापही 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. पण, सीआयडीकडून (CID) आज वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. दरम्यान, खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने (Court) त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मकोका अंतर्गत सीआयडी कोठडी मिळाल्यास जामीन मिळणे सोपं नसल्याचं कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.  त्यामुळे, मकोका अंतर्गत सीआयडी कोठडी मिळाल्यास वाल्मिकचा पाय आणखी खोलात जाईल.

केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यास आज बीड येथील तुरुंगात नेलं जाईल. येथेच वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले जाईल. त्यानंतर, सीआयडीने अर्ज केल्यानुसार उद्या मकोका अंतर्गत ताब्यात घेऊन केज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले जाईल. त्यामुळे, मकोका अंतर्गत न्यायालयात हजर केले असता, पुन्हा न्यायालयाकडून आरोपीला सीआयडी कोठडी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे.

8 प्राणी कॉर्न अंतर्गत गुन्हेगार

संघटीत गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्याने न्यायालयाकडून त्यास पुन्हा सीआयडी कोठडी सुनावण्यात येईल. या सीआयडी तपासात मकोकासंदर्भाने तपास केला जाईल, ज्यामध्ये 302 अंतर्गत दाखल झालेल्या संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. दरम्यान, यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील 8 आरोपींविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल नाही. दरम्यान, मकोकोअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मकोकाअंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मकोका अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.

खुनाचा गुन्हाच दाखल नाही, जामिनासाठी अर्ज

खुनाच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला आरोपी करण्यात आलेलं नाही, त्यामुळे मकोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे, आम्ही वाल्मिक कराडसंदर्भाने न्यायालयीने प्रक्रियेला समोरे जाऊ असं, वाल्मिक कराडचे वकील अॅड. सिद्धेश्वर ढोंबरे यांनी म्हटलंय. तर, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, जामिनासाठी अर्ज करता येणार आहे, त्यानुसार आम्ही जामीनासाठी अर्ज केला असून पुढील 2-3 दिवसांत जामीन अर्जावर सुनावणी होईल, असेही अॅड. ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

हेही वाचा

कुत्रा आडवा आल्याने महिला मंत्र्यांची कार झाडावर आदळली, 6 एअर बॅग्ज उघडल्याने कर्नाटकच्या मंत्री बचावल्या!

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.