बीड : खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. खंडणी प्रकरणात न्यायालयानं कराडला 14 दिवसांची न्यायालयीनं कोठडी सुनावली होती. यातच कराडवर ‘मकोका’ कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यानंतर ‘एसआयटी’नं कराडला मकोका कोर्टात दाखल केले आहे. ‘एसआयटी’नं कराडचा ताबा मागितला आहे.
अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराडला 14 पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर कोठडी संपण्यात आल्यानं न्यायालयात हजर केले होते. यावेळी चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, न्यायालयानं कराडच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
– Advertisement –
हेही वाचा : भाजपसोबत जाण्याबद्दल तुमचं मत काय? प्रश्न विचारताच शरद पवार चिडून म्हणाले, काहीतरी…
कराडवर मकोका…
– Advertisement –
देशमुखांच्या हत्या प्रकरणात कट रचल्याचा आरोप करत कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. यानंतर कराडला ‘एसआयटी’नं मकोका कोर्टात हजर केले आहे. चौकशी करण्यासाठी कराडला ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी ‘एसआयटी’नं मकोका कोर्टात अर्ज केला आहे.
कोर्टात काय घडलं?
कराडच्या वकिलानं सांगितलं की, “सरकारी वकिलांनी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. 31 डिसेंबरला 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तेव्हा मांडलेले मुद्देच पुन्हा आज सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस कोठडीचा अर्ज न्यायालयाने फेटाळत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.”
“मकोका लावण्यासंदर्भात न्यायालयात कुठलाही अर्ज आला नाही. आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यात तपास करायचा आहे, असं सरकारी वकिलांनी सांगितलं. पण, कुठल्याही गुन्ह्यात त्यांचा सहभाग नाही. आम्ही जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. दोन-तीन दिवसांत त्यावर सुनावणी होईल. मकोका लागला तर दुसऱ्या गुन्ह्यात कोठडी मागतील,” अशी माहिती वकिलानं दिली आहे.
परळी बंद..
वाल्मिक कराडच्या समर्थकांनी सकाळपासून परळीत आंदोलन सुरू केले होते. तसेच, वाल्मिक कराडच्या आई पारूबाई कराड सुद्धा परळीत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसल्या आहेत. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती कळताच परळी बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : मुंडेंचा राजीनामा घेण्यास अजितदादांचा नकार, शरद पवार म्हणाले, याचा निकाल…