चुकीची माणसं असतील तर बाजूला करावं लागतं…; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवा
Marathi January 15, 2025 12:25 PM

वाल्मीक कराड मकोका संतोष देशमुख खून प्रकरण: आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड यांना मंगळवारी मोठा झटका बसला. केज सत्र न्यायालयातील वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मीक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंयत आठ आरोपींवर मकोका गुन्हा दाखल आहे.

वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच विरोधकांकडून सतत धनंजय मुंडेंच्या मंत्रि‍पदाच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. याचदरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला. यावर अजित पवार यांनी रोखठोक उत्तर दिलं. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार…कुणाकडे काही पुरावे असतील त्यांनी आम्हाला द्यावे, त्यांच्यावर आम्ही कारवाई करु, असं अजित पवार म्हणाले. मी पण शेतकरी आहे. शेतकरी म्हणूनच बोलतोय. चुकीची माणसं असतील तर बाजूला करावे लागते. आम्ही चौकशी कर…कोणालाही पाठीशी घालणार नाही, असंही अजित पवारांनी सांगितले.

कुणाचेही धागेदोरे मिळाले, तर त्यावर कारवाई केली जाईल- अजित पवार

जे दोषी असतील जे कोणी असतील त्यांच्यावर करवाई करत आहोत. आरोपींना सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही. सीआयडी, एसआयटी त्यांचं काम करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हेच सांगितले. आरोपी कुणीही असो त्यांना कुठलाही थारा दिला जाणार नाही. तिथे कडक एसपी आता आम्ही पाठवलेले आहेत. पत्रकारांना ही विनंती त्यांनी ही जाऊन बघावं एसपी तिथले कसं काम करताय.  कायदा सुव्यवस्था तिथे राखायची अशा सूचनाच त्यांना दिलेल्या आहेत. कुणाचेही धागेदोरे मिळाले, तर त्यावर कारवाई केली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस तापतंय-

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यात झालेली दिरंगाई, वाल्मिक कराडला शोधण्यात पोलिसांना आलेले अपयश आणि एसआयटी पथकात कराड यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांचा असलेला समावेश अशा आरोपांमुळे बीड प्रकरणात सरकारची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा घेण्यासाठी महायुतीच्या गोटातूनही दबाव वाढल्याची चर्चा आहे. मात्र, तुर्तास अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. परंतु, यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत आहे.

संबंधित बातमी:

Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडभोवती तपासाचा फास कसा आवळला? त्या 6 फोन कॉलमुळे मकोका लागला, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.