Maharashtra Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज खारघरमधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण
Saam TV January 15, 2025 05:45 PM
Pune News : भोरमध्ये एका रात्रीत चार घरे फोडून २६ लाखांची चोरी

भोर शहरातील पोलिस ठाण्यासमोरील श्रीपतीनगरमधील बंद असलेली चार घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागीने व १० लाख १० हजारांच्या रोख रक्कमेसह २६ लाख ३५ हजार रुपयांचा चोरट्यांनी चोरून नेला. पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या. चोरी झालेल्या दोन घरातील व्यक्ती सोमवारी (ता.१३) दुपारी व सायंकाळी घरी आल्याने दोन चो-या उघडकीस आल्या. परंतु दोन घरातील व्यक्ती मंगळवारी (ता.१४) सकाळी घरी आल्यानंतर चोरी उघडकीस आली. श्रीपतीनगरमधील भारती दिपक मोरे आणि सविता विलास जेधे यांची बंद घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली. भारती मोरे यांच्या घरातील ६ लाखांची आणि सविता जेधे यांच्या घरातील ६० हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली.

Solapur News Update : सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहात 'होम प्रदीपन विधी' झाला संपन्न

- सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहात 'होम प्रदीपन विधी' झाला संपन्न..

- लाखो भक्तांच्या साक्षीने पार पडला 'होम प्रदिपण विधी'

- एकदा भक्तलिंग बोला हर्रर्रर्रर्रचा जयघोष करत होम मैदानावर मानकरी आणि सेवेकऱ्यांनी केली तुंबळ गर्दी

- यावेळी मानाच्या सात हि नंदीध्वजांना करण्यात आली होती आकर्षक विद्युत रोषणाई,पहिल्या नंदीध्वजाला नागफणीचा चढवण्यात आला होता साज..

- होम मैदानावरील अग्नि कुंडात कुंभार कन्येला प्रतिकात्मक स्वरूपात देऊन पार पाडण्यात आला 'होम प्रदिपण विधी'

- शुभ्रधवल बाराबंदी परिधान केलेल्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला होम विधी..

- अग्नीकुंडाभोवती होम विधी झाल्यानंतर मानाच्या सात नंदीध्वजांनी घातली प्रदक्षिणा

समृद्धी महामार्गावर बसला भीषण अपघात..

लक्झरी बसची ट्रकला धडक..

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पासून काही अंतरावर अपघात..

या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती..

15 जण जखमी, प्राथमिक उपचारासाठी धामणगाव रुग्णालयात दाखल.

Maharashtra Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज खारघरमधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण

भारतातील तिसरं आणि राज्यातील पहिल्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराची उभारणी नवी मुंबईतील खारघर येथे करण्यात आली असून या भव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. श्री श्री राधा मदन मोहनजी यांचे हे भव्य मंदिर असून 9 एकर जागेत याची उभारणी करण्यात आलेय. 15 वर्षांपासून या भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात येत होते. संपूर्णतः संगमरवरी दगडाने या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून मंदिरासह भव्य म्युजियम, प्रशस्त हॉल आणि विश्रामासाठी खोल्यांची व्यवस्था या मंदिरात करण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून देशविदेशातील भक्तगणं खारघर मध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज खारघर मधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण shaktipith mahamarg news : सांगली.. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आणि संघर्ष समिती आक्रमक

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत पर्यावरण खात्याकडे पुन्हा परवानगी मागण्यात आली आहे. यावरुन शक्तीपीठ महामार्ग होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. यामुळे आता बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कंत्राटदार जोपासण्यासाठी हा उद्योग करण्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना मारक असणारा निर्णय होणार असेल, तर सरकारला धडा शिकवल्या शेतकरी स्वस्थ बसणार नाही,असा इशारा महामार्ग संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

Agro News : जालन्यात युवा शेतकऱ्याने ऊसाच्या पहिल्या खेपेची डि.जे लाऊन काढली मिरवणूक...

जालन्यातील अंबड तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील एका युवा शेतकऱ्यांने उसाच्या पहिल्या खेपेची चक्क डीजे लावून मिरवणूक काढलीय.जालन्यातल्या मठपिंपळगाव येथील युवा शेतकरी धीरज जिगे यांनी जवळपास चार एकर उसाची लागवड केली आहे आणि आता तो ऊस काढणीला आल्यानंतर ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची जिगे यांनी चक्क गावाच शिवार संपेपर्यंत डीजे लावून मिरवणूक काढली. सध्या या युवा शेतकऱ्यांना काढलेल्या मिरवणुकीची परिसरामध्ये जोरदार चर्चा आहे....

Jalgaon : पतंग, मांजा दोन बालकांसह पाच जण जखमी रुग्णालयात उपचार

जळगाव तीळगुळाचे वाटप करीत सर्वत्र गोडवा पसरविणाऱ्या मकर संक्रातीच्या सणाला पतंग आणि मांजामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या घटना शहरात घडल्या. रामेश्वर कॉलनीतील सात वर्षीय बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून बेशुद्ध होऊन त्याला गंभीर दुखापत होण्यासह आठ वर्षीय बालक पतंग पकडण्यासाठी पळत असताना खाली पडल्याने चेहऱ्याला मार लागला. या शिवाय दुचाकीवर जाणाऱ्या महिलेसह दोन जणांच्या गळ्याला व हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली.

रात्रीचा पारा स्थिर, दिवसाचा मात्र पाच अंशांनी झाला कमी

जळगाव तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे रात्री पारा १३ अंशावर स्थिर आहे. तर दिवसाच्या तापमानात घट झाली आहे. हिवाळ्यात ३० अंशाच्या असलेला दिवसाचा पारा २५ अंशापर्यंत खाली आला त्यामुळे दिवसादेखील वातावरणात आल्हाददायक गारवा जाणवत होता.

तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या आठवडाभरापासून वाऱ्यांचा वेग वाढला आहे. १० किमी वेगाने असलेले वारे वेगाने वाहत आहेत. त्यामुळे जरी रात्रीचे तापमान वाढले असले तरी थंडीचा कडाका अधिक आहे.वातावरणात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारेही काही प्रमाणात सक्रीय आहे. त्यामुळे तापमान वाढले असतानाही गारठा अधिक जाणवत आहे.

Agro News : वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे ५३ हजार हेक्टरवरील सोयाबीन, ज्वारी, तूर, आणि कपाशीची या खरीप पिकांचे मोठे झाले नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने ६५ हजार शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींपेक्षा जास्त निधीची मागणी केली होती. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मदतीची प्रक्रिया रखडली. निवडणुकीनंतर तीन महिने झाले तरी मदतीचा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

Sangli : सांगली... कर्मयोगी पुरस्काराने आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील सन्मानित..

आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना सांगलीमध्ये कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शांतीनिकेतन लोक विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मानाचा कर्मयोगी पुरस्कार यंदा पाटोद्याचे आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना जाहीर झाला होता. आणि हा पुरस्कार प्रदान सोहळा हा संपन्न झाला आहे.. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे आणि ज्येष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याहस्ते व शांतिनिकेतन विद्यापीठाचे संचालक गौतम पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्मृतिचिन्ह देऊन भास्करराव पेरे पाटील यांचा गौरव करण्यात आला. तर तासगावचे आमदार रोहित पाटील देखील उपस्थित होते.

नाशिकच्या सातपूर भागात शुक्रवार आणि शनिवारी पाणीबाणी

- चुंचाळे पंपिंग स्टेशनच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा राहणार बंद

- दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी दिवसभर पाणीपुरवठा राहणार बंद

- तर शनिवारी देखील होणार कमी दाबाने पाणीपुरवठा

- सातपूरसह सिडकोतील काही भागात देखील पाणीपुरवठा राहणार बंद

- नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन

Nashik News update - नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी ४ पालकांसह ११ जणांना अटक

- मकर संक्रांतीला नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांच्या कारवाईची संक्रांत

- पतंग उडवताना नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी काल एका दिवसात १३ गुन्हे दाखल

- घातक नायलॉन मांजाचा वापर केल्याप्रकरणी ४ पालकांसह ११ जणांना अटक, न्यायालयानं सुनावली ३ पोलीस कोठडी

- नायलॉन मांजामुळे तरुणाचा बळी गेल्यानंतर पोलिसांकडून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांची धरपकड

- इमारतींचे टेरेस, छोट्या गल्ली आणि मैदानावर अचानक छापे टाकून पोलिसांची कारवाई

- तर काल संक्रांतीला पोलिसांनी जप्त केले १ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे १३३ नायलॉन मांजाचे गट्टू

चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार संपन्न

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा आज १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगरच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हे असणार आहेत. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

crime : छ्त्रपती संभाजीनगर: 21.59 कोटींचे अकरा घोटाळेबाज कारागृहात

विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटी घोटाळ्यातील पोलिस कोठडीत असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी झाली आहे. 21 डिसेंबर रोजी संकुलातील घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कंत्राटी लिपीक हर्षकुमारने कुटुंबातील सदस्य, मैत्रीण, सहकाऱ्यांच्या मदतीने हा घोटाळा केला. आर्थिक गुन्हे शाखेने यात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली. त्यात हर्षकुमारची तब्बल 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत कसून चौकशी झाली. मंगळवारी या कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यामुळे यात आता अन्य आरोपी वाढण्याची शक्यतादेखील धूसर झाली आहे. तर हर्षकुमारचा एक मित्र अद्यापही पसार आहे. गुन्ह्यात मोबाइल, टॅबसह ई-मेलआयडी बदलल्याची मुख्य भूमिका राहिल्याने आयटी अँक्टची वाढ करण्यात आली.

Nagpur News Update

- संक्रांतीच्या दिवशी पतंग उत्सवात वेगवेगळ्या ठिकाणी सतरा नागरिकांना मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करावे लागले. उत्साहात दोघांचा मृत्यू

- एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावर धावत असताना हृदयविकाराचा धक्क्याने मृत झाला

- रितेश गंधश्रीवार असे या तरुणाचे नाव असून कापलेली पतंग पकडण्यासाठी तो धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागले असताना औषध घेत असताना अचानक बेशुद्ध पडला त्याला मेडिकलमध्ये दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले

- सोहेल खान हा सहकाऱ्यांसह गिट्टीखदान परिसरात पाचव्या मजल्यावर पतंग उडवीत होता, स्लॅबवर सुरक्षा भिंत नव्हती, पतंग उडविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला त्याला जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले

- मेडिकलमध्ये दहा तर मेयो रुग्णालयात सात अशा एकूण 17 नागरिकांना नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले

- जखमींमध्ये काही रुग्ण पतंगीचा पाठलाग करून जखमी झाले तर काहींच्या बोट, नाक, कान, चेहऱ्याला इजा झाली

- तीन मुलांचे नायलॉन मांजामुळे बोट कापले गेले

Maharashtra Live Update : नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवली बैठक

- येत्या शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडणार बैठक

- एकीकडे प्रयागराजचा कुंभमेळा पार पडत असताना नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री घेणार आढावा

- बैठकीला मुख्य सचिवांसह कुंभमेळ्याशी निगडित २३ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना निमंत्रण

- मात्र नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्र्यांसह महायुतीच्या एकाही आमदाराला बैठकीचं निमंत्रण नाही, सूत्रांची माहिती

- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीपासून जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि महायुतीच्या आमदारांना दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय

- २०२६-२७ मध्ये पार पडणार नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा

नाशिकमध्ये एमडी ड्रग विक्री सुरूच

- सातपूर परिसरातून दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

- 3 लाख 87 हजार रुपयांचे ड्रग पोलिसांनी केलं जप्त

- मागच्या दोन दिवसांपूर्वी देखील काही महिलांसह ड्रग्स विक्री करणाऱ्या लोकांना पोलिसांनी घेतले होते ताब्यात

- सातपूर परिसरात ड्रग्स विक्री सुरू असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती, याच माहितीनुसार पोलिसांनी केली कारवाई

- ताब्यात घेतलेले दोघेही संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची पोलिसांची माहिती

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.