Bollywood News : अभिनेता जयदीप अहलावत त्याच्या अनेक भूमिकांमुळे प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या दमदार अभिनयाने त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याची 'पाताल लोक' वेब सिरीजचा दुसरा सीजन अवघ्या काही दिवसांनी रिलीज होणार असताना जयदीपच्या वडिलांचं निधन झालं. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला आहे.
जयदीपचे वडील दयानंद अहलावत यांचं सोमवारी 13 जानेवारी 2024 ला निधन झालं. त्यानंतर त्याच्या टीमने एक निवेदन जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं कि, "जयदीप अहलावत यांचे प्रिय वडील आता आपल्यात नाहीत, हे सांगताना आम्हाला खूप दुःख होत आहे. त्यांनी कुटुंबाच्या आणि आपल्या प्रियजनांच्या सहवासात अखेरचा श्वास घेतला. जयदीप आणि त्यांचे कुटुंब या कठीण प्रसंगाचा सामना करत आहेत, त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गोपनीयता राखावी ही विनंती आहे. आम्ही तुमच्या सहकार्याबद्दल आणि प्रार्थनांसाठी आभारी आहोत."
जयदीपच्या वडिलांनी कायमच त्याला अभिनयात करिअरसाठी प्रोत्साहन दिलं. एका मुलाखतीत त्याने सांगितलं कि,"जेव्हा मी वडिलांना सांगितलं कि मला अभिनय शिकायचं आहे तेव्हा त्यांनी मला नकार दिला नाही. ते म्हणाले,'काय होईल? फार तर काय अपयशी ठरेल आणि शेती करेल'"
जयदीपचा जन्म हरियाणात झाला. त्याचे वडील शेतकरी होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मध्ये अभिनयाचे शिक्षण पूर्ण केलं. त्याच्या वडिलांनी कायमच त्याच्या स्वप्नांना पाठींबा दिला.
जयदीपच्या गाजलेल्या पाताल लोक या वेब सिरीजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 17 जानेवारीला ही वेबसिरीज रिलीज होणार आहे. याशिवाय जयदीपचे ‘महाराज’, ‘जाने जान’, ‘थ्री ऑफ अस’ हे प्रोजेक्ट गाजले. तर राजी सिनेमातील भूमिकाही अनेकांना आवडली. पण पाताल लोक ही वेबसिरीजचं त्याच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली आहे.