म्हणून अपहरण करून संतोष देशमुख यांची हत्या केली; CID चा कोर्टात मोठा दावा
Marathi January 15, 2025 11:28 PM

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयात युक्तिवाद करताना गुन्हे अन्वेषण विभागने (CID) न्यालयात मोठा दावा करत संतोष देशमुख यांच्या हत्येमागचं खरं कारण सांगितलं आहे.

संतोष देशमुख यांची हत्या नेमकी का करण्यात आली?

‘टीव्ही 9 मराठी’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज न्यायालयात व्यक्तिवाद करताना सीआयडीने सांगितलं की, संतोष देशमुख हे अवदा कंपनीकडून खंडणी मिळवताना मोठा अडथळा ठरत होते. याच कारणावरून वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी आधी त्यांचं अपहार आणि नंतर हत्या केली, असा दावा सीआयडीने न्यायालयात केला.

सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, आणि विष्णू चाटे हे वर्मावर वारंवार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी धमकावत होते. मात्र कंपनीकडून खंडणी देण्यात आली. यातच अवादा कंपनीकडून खंडणी वसूल करताना संतोष देशमुख हे सगळ्यात मोठी अडचण ठरत होते. याचमुळे वाल्मीक कराड आणि इतर आरोपींनी त्यांची हत्या केली, असा दावा सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.