Devmanus: "देवमाणूस" हा नव्या वर्षातील बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटांपैकी एक आहे, हा सिनेमा २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तू झुठी मैं मकार, दे दे प्यार दे, मलंग, सोनू के टीटू की स्वीटी, यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे पॉवरहाऊस म्हणजेच लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचा लव फिल्म्स हा प्रोडक्शन हाऊस या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे.
तेजस देऊस्कर दिग्दर्शित "देवमाणूस" हा एक मल्टिस्टारर सिनेमा आहे ज्यामध्ये अभिनेते , रेणुका शहाणे, आणि सिद्धार्थ बोडके आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. देवमाणूस हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक नवी आणि आकर्षक कथा घेऊन येणार आहे हे नक्की.
देवमाणूसबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, “देवमाणूस प्रेक्षकांना वेग वेगळ्या भावनांचा अनुभव देईल. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ सारखे उत्तम कलाकार यात आहेत ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलो आहे. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे.”
लव फिल्म्सच्या मराठी चित्रपटसृष्टीतील उपक्रमाबद्दल बोलताना, निर्माते लव रंजन म्हणाले, "महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कला, संगीत आणि कथाकथनाने पिढ्यान पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा दिली आहे. मराठी चित्रपटांच्या या जगात पाऊल ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. देवमाणूस हा पहिला मराठी चित्रपट आम्ही निर्मित केला असून हा चित्रपट मराठी भूमीचा आणि तिथल्या लोकांसाठी बनवला आहे."