Kangana Ranaut: 'इमर्जन्सी'च्या रिलीजपूर्वी कंगना राणौतला मोठा धक्का! शेजारच्या देशात चित्रपटावर घातली बंदी
Saam TV January 15, 2025 09:45 PM

Kangana Ranaut: बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बऱ्याच विलंबानंतर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. दरम्यान, या चित्रपटावर शेजारच्या देशात बंदी घालण्यात आली आहे. 'इमर्जन्सी'ची कथा १९७५ मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. पण बांगलादेशात या चित्रपटावर बंदी का घालण्यात आली आहे ते जाणून घेऊयात

आयएएनएसच्या अहवालानुसार, च्या 'इमर्जन्सी' चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आल्याचे उघड झाले. बांगलादेशमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे कारण भारत आणि बांगलादेशमधील अलिकडच्या काळात सुरू असलेले वादग्रस्त वातावरण आहे.

'इमर्जन्सी' वर बंदी का घालण्यात आली?

कंगना राणौतच्या '' या चित्रपटात भारतीय इतिहासाचा एक खूप मोठा अध्याय दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात इंदिरा गांधींच्या सरकारने शेख मुजीबुरहमान यांना दिलेला पाठिंबा दिल्याचे दाखवण्यात आले आहे. मुजीबुरहमान यांना बांगलादेशचे जनक म्हटले जाते. चर्चा आहे की चित्रपटात दाखवलेल्या या सर्व दृश्यांमुळे चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच या चित्रपटावर बंगलादेशात घातलेली बंदी कंगना राणौतसाठी हा एक मोठा धक्का आहे.

चित्रपटात कोण कोण आहेत?

कंगना राणौत व्यतिरिक्त या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आदी कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना राणौतने केले आहे. कंगना गेल्या अनेक वर्षांपासून एका हिट चित्रपटाच्या शोधात होतो. 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या ट्रेलरला मिळणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपट चांगला व्यवसाय करेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.