Game Changer Box Office Collection Day 5: दाक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा पॉलिटिकल अॅक्शन चित्रपट गेम चेंजर १० जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पुष्पा २ नंतर साउथ सिनेमाचा हा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुरुवात फार शांतपणे झाली पण आता या चित्रपटाने जोर पकडला आहे.
गेल्या काही दिवसांत चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लक्षणीय घट झाल्यानंतर, गेम चेंजरने ५ व्या दिवशी कलेक्शन वाढ केली असून या चित्रपटाने मंगळवारी १० कोटी रुपये कमावले आहे. यासह, चित्रपटाने देशभरात कलेक्शनमध्ये १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आता हा चित्रपट १०६.१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
एस. शंकर दिग्दर्शित, गेम चेंजरमध्ये अभिनेता एच. राम नंदन आणि त्याचे वडील अप्पाना असा डबल रोल साकारत आहे. रामची पत्नी दीपिका ही भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या सहाय्यक कलाकारांमध्ये नास्सर, एसजे सूर्या, ब्रह्मानंदम, वेनेला किशोर आणि मुरली शर्मा यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
बॉलीवूड ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी गेम चेंजरच्या सोमवारच्या बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनचे रिपोर्ट शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले की, "गेम चेंजरचा 'मेक ऑर ब्रेक' सोमवारच्या तुलनेत मंदावला आहे. मकर संक्रांती / पोंगल उत्सवांमुळे आज [मंगळवार] कलेक्शनमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. #गेमचेंजर #हिंदी शुक्रवार ८.६४ कोटी, शनिवार ८.४३ कोटी, रविवार ९.५२ कोटी, सोमवार २.४२ कोटी. एकूण: ₹ २९.०१ कोटी.
पुष्पा २ बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४१
पुष्पा २ द रुलच्या रिलीजच्या सहाव्या आठवड्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घसरण झाली आहे. आतापर्यंत, चित्रपटाने १,२२३ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने तेलुगू मधून तब्बल ३३८ कोटी रुपये आणि हिंदीतून ८०४.५ कोटी रुपये कमावले आहेत. पुष्पा २ द रुलच्या तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेंमध्ये अंदाजे ५८.४६ कोटी, ७.७७ कोटी आणि १४.१५ कोटी रुपये कमावले आहेत.