सांगवे कुंभारवाडीत
फेब्रुवारीत ‘क्रिकेट’
कनेडी ः सांगवे कुंभारवाडी येथील श्री संत गोरा कुंभार सेवा मंडळ आणि ग्रामस्थ समाज, सांगवे कुंभारवाडी येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सांगवे कुंभारवाडी येथे ८ आणि ९ फेब्रुवारीला ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेच्या संघाला २१ हजार एक, उपविजेत्यास १५ हजार एक रुपये व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही पारितोषिक देण्यात येणार आहे. खेळाचे नियम आणि अटी मैदानावर सांगितल्या जातील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. ज्या संघांना सहभाग घ्यावयाचा आहे, त्यांनी ३० जानेवारीपर्यंत प्रथमेश नांदगावकर, प्रशांत पुजारी, विनायक चिंदरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
--------------
मालवणी कोकणी
जत्रोत्सवाची धूम
कणकवली ः साईस्नेह महिला औद्योगिक उत्पादन सहकारी संस्था आणि कोकणप्रेमी एकता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने मालवणी कोकणी जत्रोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच महिला बचत गट मेळावाही होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड पूर्व येथे विद्या जिमजवळ हा कार्यक्रम ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या जत्रोत्सवामध्ये मालवणी कोकणी जेवणाची, सुक्या मेव्याच्या विविध पदार्थांची व्यवस्था केली आहे. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दशावतारी नाटक, डबलबारी भजनांचा सामना, फॅशन शो, ऑर्केस्ट्रा असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
---
क्रिकेट स्पर्धेचे
दिगवळेत आयोजन
कनेडी ः ‘न्यू बॉईज दिगवळे’तर्फे खुल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा शनिवारी (ता. १८) आणि रविवारी (१९) आयोजित केल्या आहेत. विजेत्या संघाला ७ हजार १, उपविजेत्या संघाला ४ हजार १ रुपये आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रत्येक संघात नऊ खेळाडू आवश्यक आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. सहभागासाठी अजय आचरेकर, नाना लुबडे, गणेश हळदणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.