पिंपरी, ता. १५ ः सातारा येथील नियोजित शालेय राज्य किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी १७ वर्षांखालील गटामधून सदन अन्सारी (५५ किलो), पार्थ तांबरे (७० किलो) यांची पुणे विभागामधून निवड झाली. उद्या शुक्रवारी (ता.१७) आणि शनिवारी (ता.१८) ही स्पर्धा होत आहे.
या निवडीबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त (माध्यमिक शिक्षण) विजयकुमार थोरात,
शिक्षणाधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक जयराम वायळ, शाळा समितीचे सदस्य सचिन शिंगोटे,
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सोनाली पाटील, संग्राम मोहिते, राहुल मोरे, मनोज राऊत, क्रीडा प्रबोधिनीच्या शिक्षिका अक्षता बांगर यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक ऋषिकांत वचकल यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. क्रीडा प्रबोधिनी विद्यालयात हे खेळाडू सराव करतात.