संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोर्टाने आज तपास अधिकाऱ्यांना कराडचा सहभाग असल्याची खात्री केली होती का ? असा सवाल विचारला. थोड्याच वेळात कोर्ट या प्रकरणावर निर्णय जाहीर करणार आहे.
Walmik Karad Live : देशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले, चाटे, कराड यांच्यात फोन कॉल, १० मिनिटे संवाद झाल्याची एसआयटीची माहितीदेशमुखांच्या हत्येच्या दिवशी घुले, चाटे, कराड यांच्यात फोन कॉल, १० मिनिटे संवाद झाल्याची एसआयटीची माहिती
घुले, चाटे आणि कराड यांच्यात संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी फोनवरून संभाषण झाल्याची एसआयटीची माहिती.
कराडच्या कोठडीसाठी एसआयटीने ८ ते १० कारणं सांगण्यात आली आहेत.
बीड कोर्टात कराडच्या कोठडीसाठी एसआयटीकडून युक्तिवाद सुरू आहे.
हत्येच्या दिवशी कराडची देशमुखांना धमकी देण्यात आल्याचं एसआयटीने कोर्टात सांगितलं.
घुले, चाटे आणि कराड यांच्यात १० मिनिटं संभाषण झाल्याचं आणि त्यांची वेळही जुळल्याचं एसआयटीने सांगितलंय.
Nagpur Live : नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत एकाची चाकू आणि दगडाने ठेचून हत्या- नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन हद्दीत क्षुल्लक कारणावरून एकाची चाकू आणि दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे..करण नैनिकर अस मृतकाचे नाव आहे. तर यातील मुख्य आरोपी कुणाल राऊत आहे.
- यात मृतक करणं आणि आरोपी कुणाल हे दोघेही एकाच वस्तीत राहत होते. दोघांमध्ये नियमित वाद होत होता....मंगळवारी रात्री दोघांमधील वाद विकोपाला पोहचला.. यात कुणाल राऊतचे मित्र आणि त्याची पत्नी सुद्धा या वादात पडली. या चौघांनी आधी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. नंतर दगड आणि विटांनी त्याला मारहाण केली. यात रक्तस्राव होऊन जीव गेला. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे.
Walmik Karad Live Updates: वाल्मीक कराड बीड कोर्टात हजर- वाल्मीक कराड बीड कोर्टात हजर
- मकोका लावल्यानंतर कोठडीची सुनावणी
Nashik Live: विहिरीत पडलेला बिबट्या वन विभागाकडून जेरबंद- नाशिक येथील बिजोटे (ता. बागलाण) येथील गायधरा शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी खाट विहिरीत सोडत बिबट्याचे प्राण वाचवले.
- सटाणा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले.
- बिजोटे येथील शेतकरी जगन्नाथ बच्छाव यांच्या विहिरीतील विद्युत पंप सुरू करायला गेले असता त्यांना विहिरीत आवाज आला.
- त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आत बिबट्या पडल्याचे दिसले.
- सरपंच पोपट जाधव यांना याबाबत भ्रमणध्वनीवर माहिती दिली. जाधव यांनी तत्काळ सटाणा वन परिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
- ग्रामस्थांनी विहिरीभोवती मोठी गर्दी केली होती.
- बिबट्या विहिरीच्या पाण्यात तरंगत असताना ग्रामस्थांना दिसल्याने ग्रामस्थांनी तातडीने खाट दोरीच्या साह्याने विहिरीत सोडत बिबट्याला बाजेवर बसवून ठेवले व पाण्यात बुडत असलेल्या बिबट्याला जीवदान दिले.
Walmik Karad Live Updates: वाल्मील कराडला केले बीड कोर्टात हजरकेज इथून सुरक्षेच्या कारणासाठी बीड कोर्टात रवानगी. तिथेच होणार सुनावणी
पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्यातसेच त्यांच्या ताब्यातून 8 दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले असून, दुचाकी वाहन चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत. रफिक उमर जमादार वय 37 वर्ष आणि निलेश मनोहर गायकवाड वय 30 वर्ष अशी दुचाकी वाहन चोरणाऱ्या रेकॉर्डवरील अटल चोरट्यांची नावे आहेत. रफिक उमर जमादार आणि निलेश मनोहर गायकवाड यांच्याकडून पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी वाहनांची किंमत जवळपास 6 लाख 55 हजार रूपये इतकी आहे.
भारतीय सैन्य राष्ट्र उभारणीसाठी वचनबद्ध आहे आणि सीमावर्ती भागांचा सर्वांगीण विकास करत आहे - लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदीभारतीय सैन्य राष्ट्र उभारणीसाठी वचनबद्ध आहे आणि सीमावर्ती भागांचा सर्वांगीण विकास करत आहे - लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
Mumbai Live: टोरेस प्रकरणात उच्च न्यायालयाचा संताप; पोलिसांना कठोर सवालटोरेस प्रकरणात उच्च न्यायालयाने पोलिसांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त करत कठोर शब्दांत सवाल केला आहे की, "जूनपासून पोलिस काय करत होते?" न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सीए अभिषेक गुप्ता यांना पुढील सुनावणीपर्यंत संरक्षण देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. पुढील सुनावणी बुधवार, १७ जानेवारीला होणार आहे. न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत.
Walmik karad: वाल्मीक कराडला कोर्टात हजर करणार नाही, सीआयडीचा अर्ज कोर्टाने स्विकारलावाल्मीक कराडला कोर्टात हजर करणार नाहीत. सीआयडीचा अर्ज कोर्टाने स्विकारला. आता थेट बीडला सुनावणी होईल.
Walmik Karad Live Updates: हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवायला हवं; बजरंग सोनवणे यांची मागणीबजरंग सोनवणे काय म्हणाले?
संतोष देशमुख प्रकरणी Kidnapping करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती? त्यांना नंतर घरं कोणी राहायला दिली?
या सगळ्या गोष्टी तपासात येतील.
खंडणी मधील जे आरोपी होते ते कोणाच्या घरात, कोणी गाड्या पुरवल्या हे सगळं समोर येईल.
इतर आरोपींना सुद्धा मोकका लावला पाहिजे ही आमची मागणी आहे.
हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवायला हवं.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे जिथे पहिल्यांदाच एकाच वेळी एक डिस्ट्रॉयर, एक फ्रिगेट आणि एक पाणबुडी कार्यान्वित करण्यात आली- पंतप्रधान
PM Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पणलष्कर दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराच्या युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केलं. माझगाव डॉकयार्ड इथं हा कार्यक्रम पार पडला
PM Modi Live: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, लष्कर दिनानिमित्त कार्यक्रमात होणार सहभागीलष्कर दिनानिमित्त मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत.
Pune : भोरमध्ये एका रात्रीत चार घरे फोडली, २६ लाखांची चोरीभोर शहरातील पोलिस ठाण्यासमोरील श्रीपतीनगरमधील बंद असलेली चार घरे फोडून सोन्या-चांदीच्या दागीने व १० लाख १० हजारांच्या रोख रक्कमेसह २६ लाख ३५ हजार रुपयांचा चोरट्यांनी चोरून नेला. पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या. चोरी झालेल्या दोन घरातील व्यक्ती सोमवारी (ता.१३) दुपारी व सायंकाळी घरी आल्याने दोन चो-या उघडकीस आल्या. परंतु दोन घरातील व्यक्ती मंगळवारी (ता.१४) सकाळी घरी आल्यानंतर चोरी उघडकीस आली.
महायुतीच्या मंचावर आज ईव्हीएम ठेवलं पाहिजे - संजय राऊतमहायुतीच्या मंचावर आज ईव्हीएम ठेवलं राहिजे. महायुतीतील अनेक लोक कलंकित आहेत. मुंबईच्या विकासासाठी मोदींचं पाऊल पडत असेल तर स्वागत करतो असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं.
कराडला आज पुन्हा कोर्टात हजर करणार, हत्या प्रकरणी SIT ताब्यात घेणारएसआयटी आज वाल्मीक कराडची कोर्टातून कस्टडी घेणार, वाल्मीक कराडची कालची रात्र तुरुंगात गेली. त्याला आज पुन्हा केज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
Maharashtra Live : राज्यातील शाळांतील CBSE पॅटर्न राबविणारराज्यातील सरकारी शाळातंही आता सीबीएसई पॅटर्न राबविला जाणार आहे. याबाबत हालचाली सुरु सुरु झाल्या आहेत.
Nashik Live : मुंबई-नाशिक हायवेवर पाच गाड्यांचा विचित्र अपघात, दोघांचा मृत्यूमुंबई-नाशिक महामार्गावर ट्रक कंटेनेर आणि खासगी बससह पाच वाहनांचा अपघात झाला असून यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Pune Municipal Corporation LIVE : पुणे महापालिकेच्या ८० शाळांमध्ये बसविले जाणार सीसीटीव्हीपुणे महापालिकेच्या ८० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. महापालिकेच्या सर्व ३०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या ८० शाळांमध्ये ३ कोटी ७९ लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले जाणार, त्यासाठीच्या खर्चास पूर्वगणनपत्रक समितीने मान्यता दिली आहे. बदलापूर घटनेची गंभीर दखल घेत शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचे आदेश दिले होते.
Indian Railways LIVE : राष्ट्रीय राजधानीसह उत्तर भारतातील काही भागात दाट धुके, दिल्लीला जाणाऱ्या 26 गाड्या धावताहेत उशिरानेभारतीय रेल्वेनुसार, राष्ट्रीय राजधानी आणि उत्तर भारतातील काही भागात दाट धुक्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या २६ गाड्या उशिराने धावत आहेत.
दक्षिण कोरियातील महाभियोगाचे निकाल लागू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष यून यांना अटक करण्यात आली आहे, असे रॉयटर्सने भ्रष्टाचारविरोधी संस्थेच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
प्रयागराज : ४५ दिवस चालणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या तिसऱ्या दिवशी गंगा, यमुना आणि 'रहस्यमय' सरस्वती नद्यांचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर भाविक पवित्र स्नान करत आहेत.
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेली २० वर्षे सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. सीमाप्रश्नात महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावे आणि सुनावणीवेळी हजर राहण्यासाठी वकिलांवर दबाव आणावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कोल्हापुरात शुक्रवारी (ता. १७) जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे माजी आमदार मनोहर किणेकर आणि प्रकाश मरगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. १७ जानेवारी हा सीमाभागात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो, म्हणून या दिवसाची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.
Asaram Bapu LIVE : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूला ३१ मार्चपर्यंत जामीन मंजूरLatest Marathi Live Updates 15 January 2025 : अवादा कंपनीच्या मस्साजोग (ता. केज) येथील पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पण सध्या कोठडीतील वाल्मीक कराडवर अखेर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याच्या (मोका) कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच राजस्थान उच्च न्यायालयाने स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला ३१ मार्चपर्यंत हंगामी जामीन मंजूर केला आहे. जम्मू आणि काश्मीर जिल्ह्यातील राजौरी जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या (एलएसी) गावात मंगळवारी झालेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात किमान सहा जवान जखमी झाले. नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री आणि वापर वापर होत असल्याचा परिणाम म्हणून राज्यभरात मांजामुळे कापले गेल्याने तिघांचा मृत्यू झाला, तर किमान पंचवीस जण जखमी झाले. त्याचबरोबर राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झालेला दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..