Winter Special: पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू रेसिपी
Webdunia Marathi January 16, 2025 01:45 PM

साहित्य-

पिवळी मूग डाळ - एक कप

तूप - अर्धा कप

पिठी साखर - एक कप

वेलची पूड - अर्धा टीस्पून

बारीक चिरलेले काजू, बदाम

ALSO READ:

कृती-

सर्वात आधी मूग डाळ दोन तास पाण्यात भिजत ठेवावी. आता भिजलेल्या मुगाच्या डाळीमधून पाणी वेगळे करून ती मिक्सरमध्ये बारीक करावी. एका पॅनमध्ये तूप गरम करून आणि त्यात बारीक केलेली डाळ मंद आचेवर परतवावी. डाळीचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत परतवून घ्यावी. नंतर गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे. आता त्यामध्ये पिठीसाखर, वेलची पूड आणि सुका मेवा घालावे. व हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करावे. आता मिश्रणापासून छोटे लाडू बनवा. तर चला तयार आहे हिवाळा विशेष पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू रेसिपी.

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.