एकाचवेळी 5 लाखांची गुंतवणूक करुन दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Marathi January 16, 2025 04:24 PM

म्युच्युअल फंड गुंतवणूक मुंबई : नोकरी सुरु केल्यानंतर अनेक जणांकडून बचतीला सुरुवात केली जाते. पगारातील ठराविक रक्कम गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये गुंतवून बचत करता येते. बचतीच्या अनेक पर्यायांपैकी म्युच्यूअल फंड हा देखील महत्त्वाचा पर्याय आहे. म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन पर्याय असतात. एसआयपीद्वारे दरमहा ठराविक रक्कम म्युच्यूअल फंडमध्ये ठेवता येते. दुसरा पर्याय म्हणजेच एकाच वेळी मोठी रक्कम म्युच्यूअल फंडमध्ये ठेवणे. 5 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दीड कोटींची रक्कम किती वर्षात जमा होऊ शकते, याबाबतचं समीकरण जाणून घेऊया.

रिटारयरमेंटसाठी निधी आवश्यक का?

नोकरी करत असतानाच निवृत्तिनंतरच्या खर्चाचं नियोजन करणं आवश्यक असतं. त्यामुळं निवृत्तीनंतर चांगलं जीवन जगता येऊ शकतं. नियमित गुंतवणुकीतून किंवा बचतीतून पुरेशी रक्कम उभी करता येऊ शकते. यासाठी मार्केट लिंक्ड किंवा नॉन मार्केट लिंक्ड इन्वेस्टमेंट पर्याय निवडू शकता. मार्केट लिंक्ड पर्यायात इक्विटी आणि म्युच्यूअल फंडचा पर्याय उपलब्ध असतो. नॉन लिंक्ड पर्यायात मुदत ठेवींची शक्यता असते.

म्युच्यूअल फंडमध्ये वन टाइम इन्वेस्टमेंट लम्पसम द्वारे करता येते. तर, एसआयपीद्वारे दरमहा ठराविक रक्कम म्युच्यअल फंडमध्ये  जमा करता येते. जेव्हा तुम्ही दरमहा 10 हजार रुपयांची एसआयपी केली आणि अडीच लाख रुपयांची रक्कम लम्पसम म्युच्यूअल फंडमध्ये 25 वर्ष ठेवल्यास किती परतावा मिळेल. आपण 12 टक्के सीएजीआर अपेक्षित ठेवल्यास किती परतावा मिळू शकतो हे पाहावं लागेल.

10 हजार रुपयांच्या एसआयपीद्वारे 25 वर्षात 30 लाखांची गुंतवणूक होईल. त्यावर 1 कोटी 59 लाख 76 हजार 351 रुपयांचा परतावा मिळेल. त्यावेळी एकूण कॉर्पस 18976351 इतका निधी जमा होऊ शकतो. त्याचवेळी अडीच लाख रुपयांच्या लम्प समच्या गुंतवणुकीवर 25 वर्षांनी 40 लाख 16 रुपयांचा परतावा 12 टक्क्यांनी मिळू शकतो. म्हणजेच एकूण रक्कम 42 लाख 50 हजार 16 हजारांचा कॉर्पस तयार होईल.

कम्पाऊंडिंगचा फायदा लाँगटर्ममध्ये होत असतो. एखाद्यानं 25 वर्षांवरुन तो कालावधी 30 वर्षांचा केल्यास त्याची एसआयपीची गुंतवणूक 3 कोटी 52 लाख 99 हजार 138 रुपये होईल. तर, लम्पसममधील गुंतवणूक 74 लाख 89 हजार981 रुपयांची असेल.

5 लाखांची लम्पसम गुंतवणूक दीड कोटींची कशी होईल?

5 लाखांच्या लम्पसम गुंतवणुकीवर 10 वर्षात 12 टक्के सीएजीआरनं  10 लाख 52 हजार 924 रुपयांचा रिटर्न मिळेल. त्यामुळं 15 लाख 52 हजार 924 होईल. 20 वर्षात भांडवली गेन 43 लाख 23 हजार 147 रुपये असेल तेव्हा एकूण रक्कम 48 लाख 23 हजार 147 रुपयांची असेल. तर,30 वर्षात कॅपिटल गेन 1 कोटी 44 लाख 79 हजार 961 रुपये असेल त्यामुळं एकूण निधी 1 कोटी 49 लाख 79 हजार 961 रुपये होईल. म्हणजेच एखाद्या युवकानं वयाच्या 25 व्या वर्षी 5 लाखांची गुंतवणूक केल्यास त्याला 55 व्या वर्षी दीड कोटी मिळतील.

दरम्यान, 25 वर्षांहून कालावधी 5 वर्षांनी वाढवल्यास भांडवली नफा 2 कोटी 58 लाख 99 हजार 810 रुपये असेल. तर, कॉर्पस 2 कोटी 63 लाख 99 हजार 810 रुपयांचा असेल.

इतर बातम्या :

Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.