मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
Marathi January 16, 2025 06:24 PM

नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी बातमी असून केंद्र सरकारने 8 व्या वेतन (8th pay commission) आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारकडून वेतन आयोगासंदर्भात नवा विचार केला जात असल्याची चर्चा होती. 8 व्या वेतना आयोगाऐवजी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि वेतनासंदर्भात नव्या मेकॅनिझमबाबत विचार केला जात आहे. येणाऱ्या काळात नव्या फॉर्म्युलानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते, अशी चर्चा वेतन आयोगासंदर्भाने होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 व्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून 8 व्या वेतना आयोगाची स्थापन करण्यात आल्याची घोषणाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

1847 पासून आत्तापर्यंत 7 वेतन आयोगाला केंद्र सरकारीने मंजुरी दिली होती. आता, 8 व्या वेतना आयोगालाही केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी सरकारने 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. 2016 साली यापूर्वीचा 7 वा वेतन आयोग मंजूर झाला होता. त्यानुसार, 2026 मध्ये 8 वा वेतन आयोग लागू होईल. मात्र, 2025 मध्ये 8 वा वेतन आयोग स्थापन केल्यास संपूर्ण प्रकियेसाठी 1 वर्षाचा कालावधी मिळतो, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.