भारतीय शेअर बाजारात लिस्ट झालेल्या सलग 6 मेनबोर्ड आयपीओंनी गुंतवणूकादारांनी चांगला परतावा दिला आहे. क्वाड्रंट फ्यूचर टेकचा आयपीओ 290 कोटींसाठी आला होता. या आयपीओनं गुंतवणूकादरांना 27.59 टक्के लिस्टिंग गेन दिला होता. याचा शेअर लिस्ट होताना 370 रुपये होता.
स्टँडर्ड ग्लास लायनिंगचा आयपीओ 410.05 कोटींच्या उभारणीसाठी आला होता. या आयपीओनं 22.86 टक्के परतावा दिला तर 172 रुपयांना लिस्ट झाला.
इंडो फार्म इक्विपमेंटचा आयपीओ 260.15 रुपयांच्या उभारणीसाठी आला होता. इंडो फार्म इक्विपमेंटचा शेअर 256 लिस्टिंगवेळी होता. या आयपीओनं लिस्टिंग गेन 19.07 टक्के इतका दिला.
यूनिमक एअरोस्पेसचा आयपीओ 500 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आलेला या आयपीओनं सर्वाधिक 85.99 टक्के लिस्टिंग गेन दिला. लिस्टिंगवेळी शेअर 1460 रुपयांवर होते.
व्हेंटीव्ह हॉस्पिटलटीचा शेअर 1600 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. आयपीओ 716 रुपयांना लिस्ट झाला तर लिस्टिंग गेन 11.35 टक्के इतका होता.
सेनोरेस फार्मास्युटिकल्सचा आयपीओ 582.11 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आणला गेला होता. या आयपीओनं 53.45 टक्के लिस्टिंग गेन दिला होता. आयपीओ 600 रुपयांना लिस्ट झाला होता.
स्टॅलिऑन इंडिया फ्ल्यूरोकेमिकल्सचा आयपीओ बोली लावण्यासाठी आज 4.50 वाजेपर्यंत खुला आहे. या आयपीओतून 199.45 कोटींची उभारणी केली जाणार आहे. एका लॉटसाठी किमान गुंतवणूक 14025 रुपये लागतील. एका लॉटमध्ये 165 शेअर आहेत. किंमतपट्टा 85-90 रुपयांदरम्यान आहे. संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 0.04 पट, गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 10.36 पट तर रिटेल गुंतवणूकदारांकडून 7.08 पट आयपीओ सबस्क्राइब झालाय. जीएमपी 42.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित : 17 जानेवारी 2025 09:39 AM (IST)
अधिक पाहा..