भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने गुरुवारी 16 जानेवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग चौथा तर पाकिस्तानविरुद्धचा दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने याआधी पाकिस्तानवर 12 जानेवारी रोजी विजय मिळवला होता. आता टीम इंडिया रवींद्र केणी याच्या नेतृत्वात या स्पर्धेतील पाचवा आणि इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका आणि पुन्हा पाकिस्तानला पराभूत करत विजयी चौकार लगावला आहे. टीम इंडियाने 14 जानेवारी रोजी इंग्लंडवर 29 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड असा सामना रंगणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून विजयी पंच देण्याच्या तयारीत आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड पहिल्या पराभवाचा वचपा घेण्याच्या हिशोबाने मैदाानत उतरणार आहे. आता टीम इंडिया विजय मिळवते की इंग्लंड हिशोब बरोबर करते? याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना शनिवारी 18 जानेवारीला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामना मोबाईलवर फॅनकोडवर पाहता येईल.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिव्यांग टीम इंडिया : विक्रांत रविंद्र केणी (कॅप्टन), रविंद्र गोपीनाथ संते (उपकर्णधार), योगेंदर सिंह (विकेटकीपर), अखिल रेड्डी, राधिका प्रसाद, देपेंद्र सिंह (विकेटकीपर), आकाश अनिल पाटिल, सनी गोयत, पवन कुमार, जितेंद्र, नरेंद्र, राजेश, निखिल मन्हास, आमिर हसन, माजिद मागरे, कुणाल दत्तात्रेय फणसे आणि सुरेंद्र