Rinku Singh-Priya Saroj Not Engaged: रुको जरा... जल्दी क्या है! रिंकू-प्रियाच्या साखरपुड्याचं वृत्त मुलीच्या वडिलांनी फेटाळलं; म्हणाले, त्याच्या घरचे...
esakal January 18, 2025 04:45 AM

Official statement from Priya Saroj’s father on engagement rumors : टीम इंडियाची स्टार फलंदाज रिंकू सिंग आणि उत्तर प्रदेशातील येथील समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांच्या सारखपुड्याची बातमी समोर आली आहे. मात्र, सपा खासदार प्रिया सरोज यांचे वडील आणि सपा आमदार तुफानी सरोज यांनी ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार आणि मछली शहरातील समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचे वडील तुफानी सरोज यांनी ABP न्यूजशी दूरध्वनीवरून संवाद साधताना सांगितले की, भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगच्या कुटुंबीयांनी आमच्या मोठ्या जावयाकडे रिंकू आणि प्रिया यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. आमचे जावई अलीगढमध्ये सीजेएम पदावर आहेत.

सपा आमदार तुफानी सरोज पुढे म्हणाले की, आम्ही या नात्याचा गंभीरपणे विचार करत आहोत. हा लग्नाचा विषय आहे, त्यामुळे खूप विचार करून निर्णय घ्यावा लागेल. पण त्यांच्या साखरपुड्याची बातमी खरी नाही.

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत असताना सपा खासदार प्रिया सरोज यांच्या वडिलांचे हे वक्तव्य आले आहे. मात्र, सपा आमदाराने आता त्यांची मुलगी प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंग यांचा सारखपुडा झाल्याच्या या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे, ज्याचा विचार केला जात आहे.

सपा खासदार प्रिया सरोज यांनी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मछली शहर मतदारसंघातून सपाच्या तिकिटावर विजय मिळवला होता. तीन वेळा खासदार आणि विद्यमान आमदार तुफानी सरोज यांच्या त्या कन्या आहेत. प्रिया सरोजचा जन्म वाराणसीमध्ये झाला, प्रियाने तिचे शालेय शिक्षण नवी दिल्लीतील एअर फोर्स गोल्डन ज्युबिली इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बीएचे शिक्षण घेतले. तिचा जन्म २३ नोव्हेंबर १९९८ रोजी झाला आहे. तिला राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.