Womens U19 T20 World Cup : महिलांच्या १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला उद्यापासून सुरूवात होणार आहे. मलेशिया येथे यावेळी चे आयोजन करण्यात आले आहे. तीन सामन्यांनी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या आवृत्तीला सुरूवात करण्यात येणार आहे. भारताचा स्पर्धेतील पहिला सामना वेस्ट इंडिजविरूद्ध १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कुठे पाहाता येईल सामना ?जीओ स्टार या डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपल्याला हे मधील सर्व सामने पाहायला मिळणार आहेत. तर, सेमीफायनल व फायनलचा सामना आपल्याला स्टार स्टोर्ट्स २ या टीव्ही चॅनेलवर पाहायला मिळणार आहे.
गटनुसार विभागणीचार गटांमधून प्रत्येकी ३ संघ हे Super Six साठी पात्र ठरतील. १२ संघांची पुन्हा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप १ मध्ये अ व ड गटातील अव्वल तीन संघ असतील, तर ग्रुप २ मध्ये ब व क गटातील अव्वल तीन संघ असतील. सुपर सिक्समध्ये प्रत्येक विजय, गुण व नेट रन रेट महत्त्वाचा ठरणार आहे. या गटात प्रत्येक संघ दोन सामने खेळतील आणि त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने ३१ जानेवारीला होतील, तर फायनल २ फेब्रुवारीला होईल.
'अ' गट - भारत, मलेशिया, श्रीलंका, वेस्ट वेंडिज
'ब' गट - इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका
भारताच्या संघात सानिका चाळके ( उप कर्णधार), भाविका अहिरे ( यष्टिरक्षक) व इश्वरी अवसारे या तीन मराठी मुलींचा समावेश आहे.
भारतीय महिला संघगोंगडी त्रिशा, निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), आयुषी शुक्ला, भाविका अहिरे, इश्वरी अवसारे, व्हिजे जोशिस्ता, जी कामालिनी, द्रीथी केसरी, अनादिता किशोर, मिताली विनोद, परूणीका सिसोडिया, वैष्णवी शर्मा, शबनम शकील, सोनम यादव
भारताचे वेळापत्रक१९ जानेवारी २०२५ : भारतविरूद्ध वेस्ट इंडिज, सकाळी ८ वाजता
२१ जानेवारी २०२५ : भारतविरूद्ध मलेशिया, दुपारी १२ वाजता
२३ जानेवारी २०२५ : भारतविरूद्ध श्रीलंका, दुपारी १२ वाजता