1842 - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म.
1947 - प्रसिद्ध गायक , अभिनेते कुंदनलाल सैगल यांचे निधन
1956- संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत गोळीबार यात १० जण ठार झाले
1971 - प्रजासमाजवादी नेते, सर्वोत्कृष्ट संसदीय वक्ते व माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे बेळगाव येथे निधन.
1996 - विख्यात अभिनेते, तेलगू देसमचे संस्थापक आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामाराव यांचे निधन.
1999 - नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांना "भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
2003 - हिंदी साहित्याचे आधारस्तंभ, विख्यात कवी हरिवंशराय बच्चन यांचे निधन. महानायक अमिताभ बच्चन हे हरिवंशराय यांचे पूत्र
2003 ः जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या ‘आकाश’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर येथील तळावर यशस्वी चाचणी.
2003 - राज्यातील लोकशाही आघाडी सरकारचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी शपथ घेतली
2005 - एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण
Next : आतापर्यंतच्या 7 वेतन आयोगांमुळे सरकारी नोकरदारांची कशी झाली चांदी? वाचा एका क्लिकवर...