Predicted Indian cricket team for Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) १८ जानेवारीला आगामी आयसीसी स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार परिषदेत पार पडेल आणि यावेळी कर्णधार उपस्थित असणार आहे. याच पत्रकार परिषदेत इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठीचाही संघ जाहीर होईल आणि तोच संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार आहे.
Who will be in Team India for the 2025 Champions Trophy इंग्लंडविरुद्धची वन डे मालिका ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यासोबत अ गटात समावेश करण्यात आला आहे. टीम इंडियाचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होईल आणि त्यानंतर २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्धचा महामुकाबला होईल. भारताचा साखळी गटातील अंतिम सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. खेळणार आहे.
कराची येथे १९ फेब्रुवारी रोजी यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. दरम्यान, सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाठीच्या दुखण्याने दुखावलेल्या जसप्रीत बुमराहच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सर्वांच्या नजरा असतील. त्याच्या खेळणाऱ्यावर सस्पेन्स आहे आणि त्याचं उत्तर उद्या मिळण्याची शक्यता आहे.
Predicted Indian cricket team for Champions Trophy 2025 त्याशिवाय भारतीय संघात यष्टिरक्षक-फलंदाज कोण असेल, याचीही सर्वांना उत्सुकता आहे. कारण, लोकेश राहुलचे नाव आघाडीवर आहे आणि राखीव यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत, संजू सॅमसन व ध्रुव जुरेल यांच्यात शर्यत आहे. संजूने विजय हजारे ट्रॉफीसाठीच्या सराव सत्रात सहभाग न घेतल्याने त्याची केरळ संघात निवड झाली नाही. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्म दाखवता आला नाही. त्याचे सराव शिबिरात भाग न घेण्याच्या कारणाची आहे.
मोहम्मद शमीने वन डे वर्ल्ड कप फायनलनंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन केले आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे. त्याचाही चॅम्पियन्स ट्रॉफीत समावेश केला जाऊ शकतो. कुलदीप यादव हाही पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तोही संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. रोहित सह सलामीला कोण, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शुभमन गिलला संधी की यशस्वी जैस्वालचे वन डे त पदार्पण, हेही उद्याच कळेल.
- रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, वॉशिंग्ट सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज