Ladki Bahin Yojana : अपात्रेची टांगती तलवार, पडताळणीआधीच हजारो लाडक्या बहिणींची माघार
Saam TV January 18, 2025 04:45 PM

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. या पडताळणीतून अपात्र महिलांना बाद केले जाणार असल्याचीही माहिती समोर आली होती. मात्र, आता पडताळणी होण्याआधीच महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. (Ladki Bahin Yojana)

राज्यभरातून तब्बल ४००० महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. ज्या लाडक्या बहिणी अपात्र असूनही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांचे महिलांनी माघारी घ्या, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करा, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केले होते. त्यानंतर महिलांच्या मनात भीती निर्माण झाली होती. दरम्यान, आता ४००० महिलांनी अर्ज माघारी घेतले आहेत. या योजनेत अपात्र महिलांकडून दंड घेतला जाणार असल्याची चर्चा सुरु होती. त्याच पार्श्वभूमीवर महिलांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. (Ladki Bahin Yojana Update)

अपात्र असूनही चा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनी या योजनेतून अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ४००० महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे.

अपात्र लाडक्या बहिणींना अर्ज माघारी घेण्यास सांगितले होते. महिला व बालकल्याण विभागाला लेखापत्रक लिहून अर्ज मागे घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आता महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. यामध्ये ३ ते ४ लाख अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच हजारो महिलांनी अर्ज मागे घेतले आहेत. पडताळणी झाल्यावर बहिणींना पैसे परत करावे लागतील. याच भीतीने महिलांनी अर्ज मागे घेतले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.