Latest Maharashtra News Updates : सैफ अली खान प्रकरणातील आरोपीला वांद्रे कोर्टात आणलं
esakal January 19, 2025 10:45 PM
सैफ अली खान प्रकरणातील आरोपीला वांद्रे कोर्टात आणलं

सैफ अली खान प्रकरणातील आरोपीला वांद्रे कोर्टात आणलं गेलं आहे. ओळख लपवण्यासाठी आरोपीने केस देखील कापल्याची माहिती आहे.

'महाराष्ट्रात शिरलेल्या बांग्लादेशींना परत पाठवावं'

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सैफ अली खानवर हल्ला प्रकरणातील आरोपीवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांचे आभार मानत महाराष्ट्रात घुसलेल्या रोहिंग्या, बांग्लादेशींना परत बांग्लादेशमध्ये परत पाठवण्याची मागणी सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.

Mumbai Live: मोहम्मद शरीफूल इस्लाम शेहजाद खार पोलीस ठाण्यातून ताब्यात

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील अटक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याला खार पोलीस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.

Mumbai Live: सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला थोडावेळात कोर्टात हजर करणार

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला थोडावेळात कोर्टात हजर करणार. या ओरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली होती

Beed Live: बीडमध्ये बसने चिरडलेल्या युवकांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत जाहीर

बीडमध्ये एसटी बसने चिरडलेल्या ३ युवकांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे.

Beed Live: बीडमध्ये सरपंच हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये जनआक्रोश

बीडमध्ये सरपंच हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये जनआक्रोश पाहायला मिळत आहे. या मोर्चात देशमुख कुटुंबासह मनोज जरांगेही सहभागी होणार आहेत.

Nawab Malik Live : पक्षाची बदनामी होतेय, लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या- नवाब मलिक

एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी असून लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा असे नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिरामध्ये म्हटलं आहे.

Buldhana Live : दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला डाॅक्टरचा मृत्यू

बुलडाण्यात मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरामध्ये दरोडेखोर घुसून डॉक्टर पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Beed Live : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना एसटीने उडवले, तिघांचा जागीच मृत्यू

बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बीड परळी महामार्गावर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एसटीने उडवले असून याच तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Dhananjay Munde Live : मंत्री धनंजय मुंडे शिबिरात सहभागी

दोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. मंत्री धनंजय मुंडे या अधिवेशनाला येणार नसल्याची चर्चा होती, पण आज ते दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित राहिले.

Beed Accident News : रस्त्याकडेला भरतीचा सराव करत होते तरुण, एसटीने चिरडल्यानं तिघांचा मृत्यू

बीडमध्ये एसटी बसच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या पाच तरुणांना बसनं चिरडल्यानं ही घटना घडली. दोघे जखमी असल्याची माहिती समजते. तरुण रस्त्याच्या कडेला सराव करत होते.

राज्यात पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यानं शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. तर गोगावलेंच्या समर्थकांनी महामार्ग रोखून निषेध केला. मंत्री गोगावले म्हणाले की, जी यादी जाहीर झाली ती धक्कादायक आहे. ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत. त्यांनी विचार केला असेल.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं. दोन्ही नेत्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.

सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, पोलिसांनी दिली माहिती

मोहम्मद अलियानला ठाण्यातून अटक, त्यानं विजय दास असं नाव सांगितलं होतं. त्याची चौकशी करायची आहे.

आरोपी बांगलादेशी असल्याचे प्राथमिक पुरावे सापडले आहेत. त्याच्याकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नाहीत. ओळखपत्र आढळून आलं नाही.

बांगलादेशी असून घुसखोरी केल्यानंतर त्यानं नाव बदललं असू शकतं. विजय दास नावाने तो इथं राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो इथं राहतोय. पाच ते सहा महिन्यांपूर्वी इथं आलाय. १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला असल्याची पोलिसांची माहिती.

Pune: सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी, चोरट्याला अटक

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी

सिंहगड रस्ता भागात एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला सिंहगड पोलिसांनी केली अटक

भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव चौफुला, गडदे वस्ती, ता. दैांड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव

चंदनाचे झाड तोडून आरोपीकडून विक्रीला नेत असताना पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केली अटक

SSC-HSC Exam :बोर्डाकडून राज्यात कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षांसाठी २० ते २६ जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह असेल. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.

Pune : भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या, घरमालकांना आदेश

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार, घरमालकांनी भाडेकरूंच्या ओळखी, पत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती पोलिसांना सादर करणे आवश्यक आहे. संभाव्य गुन्हेगारी व समस्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

किल्ले राजगड आणि तोरणागडावर बिबट्याचा मुक्त संचार; पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

किल्ले तोरणागड आणि मेटपिलावरे (ता. राजगड) परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसून येत आहे, ज्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोरणागडावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये बिबट्याचा चित्रीकरण केला आहे. यामुळे वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

रायगडमध्ये पालमंत्रीपदावरून नाराजीनाट्य, गोगावलेंच्या समर्थकांनी रोखला महामार्ग

राज्यात कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याची यादी जाहीर झालीय. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद पेटला आहे. आदिती तटकरे यांना जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलंय. तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांना कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्री केलेलं नाहीय. यामुळे गोगावले समर्थकांनी नाराजी व्यक्त करत महामार्ग रोखण्यात आला होता.

Weather Update : राज्यात अवकाळीचे संकट, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला इशारा

राज्यात अवकाळी पावसाचे संकट असून काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.