Maharashtra News Live Updates: नवी मुंबईतील आगरी कोळी महोत्सवाला आदिती तटकरे यांची हजेरी
Saam TV January 20, 2025 01:45 AM
नवी मुंबईतील आगरी कोळी महोत्सवाला आदिती तटकरे यांची हजेरी

नवी मुंबईतील आगरी कोळी महोत्सवला महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली भेट.

आगरी कोळी संस्कृती आणि परंपरेचे केले कौतुक.

रायगडचे पालकमंत्री पद घोषित झाल्यावर वाद सुरु झाल्याने मीडियाशी बोलण्यास अदिती तटकरे यांनी दिला नकार.

पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण पेटले असल्याने आदिती तटकरे यांनी साधली चुप्पी.

Nashik : नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लावली हजेरी

नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक आयोजित करण्यात आली.

जिल्हाप्रमुख , महानगरप्रमुख सहसंपर्कप्रमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली आहे.

22 जानेवारी रोजी राम मंदिराचा वर्धापन दिन आणि 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त भगवा पंधरवाडा शहरात राबवला जाणार आहे.

Pune : रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू

रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू

हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत ६५ रिक्षा चालकांना नोटीसा काढण्यात आल्या

आरटीओने रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्स ॲप क्रमांक सुरू केला.

Mahakumbh : महाकुंभ परिसरात अग्नितांडव, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान अग्निशमन दलाच्या ५० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचली आहे. सेक्टर १९ मध्ये ही घटना घडली आहे. शास्त्री पूल आणि रेल्वे पूल या दोन पुलांच्या खाली आग लागली आहे. गॅस सिलेडंरच्या स्फोटामुळे ही भीषण आग लागली आहे असा अंदाज वर्तवला जात आहे.

Mumbai : मुंबईतील आरएसएस च्या कार्यालयात भाजपचे मंत्री आणि आरएसएस चे प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरु.

मुंबईतील आरएसएस च्या कार्यालयात भाजपचे मंत्री आणि आरएसएस चे प्रमुख नेत्यांमध्ये बैठक सुरु.

भाजपा महायुतीची पुन्हा सत्ता आल्यानंतर ही पहिलीच बैठक.

भाजपा आणि आरएसएसमध्ये समन्वय कसा साधावा, कुठल्या मुद्द्याना प्राधान्य द्यावं यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता.

चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, नितेश राणे यांच्यासह प्रमुख नेते बैठकीला उपस्थित.

Solapur : सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथे तरुणाच्या अंगावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू

सोलापूर - हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथे तरुणाच्या अंगावरून ट्रक गेल्याने जागीच मृत्यू.

अमित नागणे असं अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नळदुर्ग शेतकरी युवकाच नाव.

मोटरसायकल वरुन शेताकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गालगतच्या मशीद जवळ ट्रकने धडक देवुन अंगावरून गेल्याने जागीच झाला मृत्यू.

Manoj Jarange Patil : अन्याय थांबवायचा असले तर धनंजय मुंडे यांच्या टोळ्या संपवाव्या लागणार आहे - मनोज जरांगे Beed : एसटीच्या धडकेत मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये मिळणार - प्रताप सरनाईक

पोलीस भरतीचा सराव करताना एसटी बसच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचे निधन झाले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना राज्य सरकार किंवा एस टी महामंडळाच्या वतीने आर्थिक सहाय्य करण्याची मागणी करण्यात आली होती.

Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरण, आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

सैफ अली खान हल्ला प्रकरण

आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

वांद्रे महानगर दंडाधिकारी कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी..

Navi Mumbai: नेरुळ सेक्टर 28 मधील एका गॅरेजला लागली भीषण आग

नवी मुंबई - नेरुळ सेक्टर 28 मधील एका गॅरेजला लागली भीषण आग.

शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती.

गॅरेज मध्ये ऑइल आणि इतर ज्वलनशील पदार्थ असल्याने आगीने भीषण स्वरूप घेतले होते.

आगी मध्ये संपूर्ण गॅरेज जळून खाक, गॅरेज मधील बुलेट गाडी देखील जळाली.

अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आगीवर मिळवले नियंत्रण.

सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही.

Walmik Karad: खंडणी प्रकरणातील कराडच्या जामीन अर्जावर सोमवारी होणार सुनावणी

- खंडणी प्रकरणातील कराड याच्या जामीन अर्जावर उद्या सोमवारी होणार सुनावणी

- वाल्मीक कराड यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी बारा गुन्ह्यांमध्ये ते निर्दोष मुक्त झालेले आहेत..

- याबाबतची कागदपत्रे तपास अधिकाऱ्यांकडे सादर केली आहेत

- खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी जो उशीर झाला, त्यावरून वाल्मीक कराड यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आमच्या पक्षकाराचा स्टॅन्ड आहे

- वाल्मीक कराड यांच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत..

Raigad News: रायगड पालकमंत्री पदाचा वाद चिघळणार, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

रायगड पालकमंत्री पदाचा वाद चिघळणार

जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले सामुहिक राजिनामे

उपमुख्यमंत्री व सेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले सामुहिक राजिनाम्याचे पत्र

पालकमंत्री पद राष्ट्रवादीला दिल्याने व्यक्त केला निषेध

भरत गोगावले यांना डावलल्याने शिवसेनेत मोठी नाराजी

Hingoli News: हिंगोलीमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारावर झालेले दोन्ही हल्ले बनावट

हिंगोली - विधानसभा निवडणुकीत उमेदवारावर झालेले दोन्ही हल्ले बनावट

पोलीस तपासात बाब उघड

कळमनुरी विधानसभेचे उमेदवार दिलीप नाइक तर वसमत विधानसभेचे शिवस्वराज्य पक्षाचे उमेदवार गुरू पादेश्वर महाराज यांच्यावरील हल्ला बनावट

दोन आरोपींना पोलिसांनी केली अटक

Buldhana News: केस गळती प्रकरणात कृषी विभाग व जिल्हा प्रशासन जबाबदार - रविकांत तुपकर

बुलढाणा - केस गळती प्रकरणात कृषी विभाग व जिल्हा प्रशासन जबाबदार..

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरळ आरोप..

आय सी एम आर यांनी केलेल्या प्राथमिक अंदाजावर तुपकरांची प्रतिक्रिया..

वातावरनातील विषारी द्रव्य मुळे केस गळती होत असल्याचा आय सी एम आर यांचा प्राथमिक अंदाज..

शेतीपिकावर रासायनिक कीटक नाशके फवारणी केल्यानी शेत जमिनीत रासायनिक घटकाचे प्रमन् जास्त झाले आहेत ..

ते पाणी जमिनीत मुरतंय..तेच आणी वापरात व पिण्यात येत आहे.. त्यामुळे शक्यता आहे.. यात कृषी विभागाने संशोधन करणे गरजेचे..

Beed News: एसटी बसने चिरडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी १० लाख रुपये मदत

बीड - एसटी बसने चिरडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मिळणार मदत..

३ तरुणांच्या कुटुंबीयांना मिळणार प्रत्येकी १० लाख रुपये मदत

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा

आमदार संदीप क्षिरसागर यांनी सोशल मिडीयात पोस्ट करून दिली माहिती

Amravati News: अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठजवळ अपघात

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठजवळ अपघात

अपघातानतंर थेट एका नागरिकांच्या घरात कार शिरली

सुदैवाने यात जीवितहानी नाही

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको

अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासाभरापासुन ठप्प

अतिक्रमण करून राहणाऱ्या लोकांना घरासाठी जागा देण्यासाठी मागणी

आपल्या घराच्या किरकोळ मागणीसाठी नागरिकांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखला

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात, एक जण जागीच ठार

समृद्धी महामार्ग चानैज क्रमांक 336.8 मुंबई कॉरिडोर वर एक भीषण अपघात झाला.

अपघात एवढा जोराचा होता की यामध्ये कारचा अक्षरचा चुराडा झाला व रस्त्यावर कारचे अलग अलग पार्ट विखुरली गेले.

सकाळी कार क्रमांक MP-28-CB-9530 चा चालक श्रव मेलानी वय वीस वर्ष राहणार नागपूर, हे आपल्या मित्रासोबत नागपूर वरून संभाजीनगरकडे जात असताना कारचालकला झोपेची डुलकी लागल्याने कार अनियंत्रित होऊन समोर जात असलेला ट्रक वर जाऊन धडकली.

धुळे मॅरेथॉनच्या अनुषंगाने प्रोमो रन व हॅप्पी स्ट्रीट फन फेस्टिव्हल उत्साहात संपन्न

धुळे मॅरेथॉन 2025 सीजन - 3 च्या अनुषंगाने आयोजित प्रोमो रन आणि हॅप्पी स्ट्रीट फन फेस्टिव्हलचा भव्य उपक्रम कालिका माता मंदिर परिसरात उत्साहात पार पडला आहे.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रोमो रनच्या निमित्ताने नागरिकांनी आरोग्य आणि फिटनेससाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

हॅप्पी स्ट्रीट फन फेस्टिव्हल ने सर्व वयोगटातील नागरिकांना एकत्र आणून मनोरंजन, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे.

या उपक्रमामुळे धुळे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर बसला अचानक आग, बस चालकाच्या प्रसंगावधानाने 12 प्रवाशांची जीव वाचले

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली.

तातडीने आयआरबी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली.

या शिवशाही बस मधून 12 प्रवासी प्रवास करत होते. मात्र बस चालकाच्या बसला आग लागल्याचे लक्षात येताच त्याने बस बाजूला घेतली व 12 प्रवाशांना तातडीने खाली उतरवले.

त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला. बस चालकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र बसने अचानक पेट घेतल्याने एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ठप्प झाली. मात्र आग विझताच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Saif Ali Khan: सैफ अली खान हल्ला प्रकरण, आरोपीला आज वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार

सैफ अली खान हल्ला प्रकरण

आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात

आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आले आहे

थोड्याच वेळात वांद्रे येथील भाभा रुग्णालयात त्याची आरोग्य तपासणी करण्यात येणार

त्यानंतर त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरण, संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यू निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन

या मोर्चात जवळपास एक लाख नागरिक सहभागी होण्याची शक्यता

पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त या मोर्चाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात असणार आहे

वाहने आणि मोर्चा मार्गावरील गर्दी पाहता वाहतुकीत देखील पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत

शहरातील चार प्रमुख मार्गांवरील रस्ते मोर्चा सकाळी १० वाजल्यापासून तर संपेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pune News: पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर शिवशाही बसला अचानक आग

पुणे- मुंबई एक्स्प्रेस हायवेवर बसला अचानक आग

बस चालकाच्या प्रसंगावधानाने 12 प्रवाशांचा जीव वाचला

आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Pune News: मुंबई - पुणे महामार्गावर वाहनाला भीषण आग

मुंबई - पुणे महामार्गावर वाहनाला भीषण आग

तळेगाव टोल नाक्याच्या पुढे लागली आग

आगीमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

Amravati News: चंद्रशेखर बावनकुळे २५ जानेवारीलाा अमरावतीच्या दौऱ्यावर

राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर

पालकमंत्री पदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेणार पश्चिम विदर्भाचा महसूल विभागाचा आढावा आढावा

पश्चिम विदर्भातील पाचही जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त सोबत पालकमंत्री बावनकुळे यांची बैठक

Dharashiv News: धाराशिवमधील त्या वाघाचा शोध सुरूच, वन विभागाच्या पथकाने २३०० हेक्टर वनक्षेत्र घातले पालथे

धाराशिवमधील त्या वाघाचा शोध सुरूच

वन विभागाच्या पथकाने २३०० हेक्टर वनक्षेत्र घातले पालथे

गेल्या पाच दिवसांपासून सुरू आहे शोध मोहीम

वाघ सापडेपर्यंत शोध मोहीम सुरूच राहणार

Dhananjay Munde: धनंजय मुंडे शिर्डीत दाखल, नवसंकल्प शिबिराला लावणार हजेरी

धनंजय मुंडे पहाटे चार वाजता शिर्डीत दाखल

धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

धनंजय मुंडे आणि अजित पवार शिर्डीतील हॉटेल सन अँड सॅण्ड येथे मुक्कामी.

मुंडे यांची काल नवसंकल्प शिबिराला दांडी तर आज लावणार हजेरी

पालकमंत्रीपदी डावलल्यानंतर मुंडे पहाटे शिर्डीत दाखल

संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.