पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. प्रयागराज आगीच्या परिस्थितीची माहिती घेतली.
Thane News: कल्याणमध्ये पोलीस व्हॅनमधून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या विठ्ठलवाडी पोलिसांनी आवळल्याशनिवारी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आल्यावर आधारवाडी कारागृहात नेण्यात येत असताना कल्याणच्या खडकपाडा येथे व्हॅन मधून पळालेल्या आरोपीच्या मुसक्या उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आवळल्या आहेत.
Live : सरसंघचालकांच्या विधानानंतर युवक काँग्रेस आक्रमक, अटकेची केली मागणीNagpur News : नागपुरमध्ये युवक काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. काँग्रेस भवन ते संघ मुख्यालय या मार्गावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. मोहन भागवत यांना अटक करा, आरएसएस बॅन असे बॅनर आंदोलकांच्या हातामध्ये होते.
Pune Live : पुणे आरटीओकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू, रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे घेतला निर्णयरिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत ६५ रिक्षा चालकांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. आरटीओने रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्स ॲप क्रमांक सुरू केला आहे.
प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यातील आग आटोक्यात आली आहे. एनडीआरएफचे डीआयजी एमके शर्मा यांनी याबाबत माहिती दिली. एनडीआरएफच्या चार टीम घटनास्थळी तैनात आहेत.
मोहन भागवतांच्या विरोधात नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलनसरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाविरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केलं आहे.
Solapur Live: भूखंडसम्राटांविरोधात जुळे सोलापूरकरांचे जनआंदोलनभूखंडसम्राटांच्या विरोधात जुळे सोलापूरकरांनी एल्गार पुकारला असून एसटी स्टँड, नाट्यगृह, प्रसूतीगृह, अग्निशामक दल आवश्यकच आहे.
लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांच्या विरोधात २९ जानेवारी रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Live: चिनाब ब्रिगेडने परगवालमधील तरुणांसाठी संगणक प्रशिक्षण वर्ग आयोजित केलाटायगर डिव्हिजनच्या चिनाब ब्रिगेडने सीमावर्ती गाव परगवालमधील तरुणांसाठी संगणक प्रशिक्षण वर्ग आयोजित केले, जेणेकरून त्यांना विविध संधी उपलब्ध होतील आणि सामुदायिक विकासाला चालना मिळेल
Solapur Live : सोलापूर विकास मंचच्या सदस्यांची एनटीपीसी प्रकल्पास भेटसोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी एनटीपीसी सोलापूर प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनातील अनेक शंका दूर केल्या.
या प्रकल्पामध्ये अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
एनटीपीसी सोलापूर प्रकल्पातून तयार होणारी वीज पाच राज्यांत पॉवर ग्रीडच्या माध्यमातून वितरित होत असल्याचे यावेळी एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंडे बोलले पण अर्थ तसा नाही -तटकरमुंडे बोलले पण अर्थ तसा नाही -तटकर
मनाविरूद्ध घडल्याने मी नाराज- भरत गोगावलेमनाविरूद्ध घडल्याने मी नाराज- भरत गोगावले
Mahakumbh Mela 2025 Liveupdate: योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याची केली पाहणीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याची केली पाहणी
Mumbai Live: आरोपी बांग्लादेशी असल्याचं सिद्ध झालं नाही - वकीलआरोपीला कोणी मदत केली हे तपासायचं असल्याची प्रतिक्रिया वकिलांनी दिली आहे. तसंच तो बांग्लादेशी आहे हे अजून सिद्ध झालं नसल्याचं आरोपीच्या वकिलांना सांगितलं आहे.
सैफ हल्ला प्रकरणातील आरोपीला 5 दिवसाची पोलीस कोठडीसैफवर हल्ला करण्यात आलेल्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वांद्रे कोर्टाने आरोपीला पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी शहजाद बांग्लादेशी असल्याने त्याला मदत नक्की कोणी केली? हे तपासण्यासाठी पाच दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 719 उमेदवारांचे अर्ज स्वीकारलेअंतिम छाननीनंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 719 उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 1522 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी आहे.
सैफ अली खान प्रकरणातील आरोपीला वांद्रे कोर्टात आणलं गेलं आहे. ओळख लपवण्यासाठी आरोपीने केस देखील कापल्याची माहिती आहे.
'महाराष्ट्रात शिरलेल्या बांग्लादेशींना परत पाठवावं'भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सैफ अली खानवर हल्ला प्रकरणातील आरोपीवर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिसांचे आभार मानत महाराष्ट्रात घुसलेल्या रोहिंग्या, बांग्लादेशींना परत बांग्लादेशमध्ये परत पाठवण्याची मागणी सोमय्या यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील अटक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याला खार पोलीस ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीला थोडावेळात कोर्टात हजर करणार. या ओरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली होती
Beed Live: बीडमध्ये बसने चिरडलेल्या युवकांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत जाहीरबीडमध्ये एसटी बसने चिरडलेल्या ३ युवकांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत केली जाणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले आहे.
Beed Live: बीडमध्ये सरपंच हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये जनआक्रोशबीडमध्ये सरपंच हत्येच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये जनआक्रोश पाहायला मिळत आहे. या मोर्चात देशमुख कुटुंबासह मनोज जरांगेही सहभागी होणार आहेत.
Nawab Malik Live : पक्षाची बदनामी होतेय, लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या- नवाब मलिकएका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी असून लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा निर्णय घेण्यात यावा असे नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या शिबिरामध्ये म्हटलं आहे.
Buldhana Live : दरोडेखोरांच्या मारहाणीत महिला डाॅक्टरचा मृत्यूबुलडाण्यात मध्यरात्री एका डॉक्टरच्या घरामध्ये दरोडेखोर घुसून डॉक्टर पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
Beed Live : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना एसटीने उडवले, तिघांचा जागीच मृत्यूबीड तालुक्यातील पिंपळनेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बीड परळी महामार्गावर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच तरुणांना एसटीने उडवले असून याच तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Dhananjay Munde Live : मंत्री धनंजय मुंडे शिबिरात सहभागीदोन दिवस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प अधिवेशन शिर्डीत पार पडत आहे. मंत्री धनंजय मुंडे या अधिवेशनाला येणार नसल्याची चर्चा होती, पण आज ते दुसऱ्या दिवशी अधिवेशनाला उपस्थित राहिले.
Beed Accident News : रस्त्याकडेला भरतीचा सराव करत होते तरुण, एसटीने चिरडल्यानं तिघांचा मृत्यूबीडमध्ये एसटी बसच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या पाच तरुणांना बसनं चिरडल्यानं ही घटना घडली. दोघे जखमी असल्याची माहिती समजते. तरुण रस्त्याच्या कडेला सराव करत होते.
राज्यात पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यानं शिवसेनेचे भरत गोगावले नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. तर गोगावलेंच्या समर्थकांनी महामार्ग रोखून निषेध केला. मंत्री गोगावले म्हणाले की, जी यादी जाहीर झाली ती धक्कादायक आहे. ठीक आहे, एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत. त्यांनी विचार केला असेल.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. सर्वांच्याच मनाचं समाधान होईल असं नसतं. दोन्ही नेत्यांनी घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल.
सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर, पोलिसांनी दिली माहितीमोहम्मद अलियानला ठाण्यातून अटक, त्यानं विजय दास असं नाव सांगितलं होतं. त्याची चौकशी करायची आहे.
आरोपी बांगलादेशी असल्याचे प्राथमिक पुरावे सापडले आहेत. त्याच्याकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे नाहीत. ओळखपत्र आढळून आलं नाही.
बांगलादेशी असून घुसखोरी केल्यानंतर त्यानं नाव बदललं असू शकतं. विजय दास नावाने तो इथं राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून तो इथं राहतोय. पाच ते सहा महिन्यांपूर्वी इथं आलाय. १५ दिवसांपूर्वी मुंबईत आला असल्याची पोलिसांची माहिती.
Pune: सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी, चोरट्याला अटकपुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर चंदन चोरी
सिंहगड रस्ता भागात एका बंगल्यातून चंदनाचे झाड कापून नेणाऱ्या चोरट्याला सिंहगड पोलिसांनी केली अटक
भरत शिवाजी जाधव (वय ३४, रा. केडगाव चौफुला, गडदे वस्ती, ता. दैांड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव
चंदनाचे झाड तोडून आरोपीकडून विक्रीला नेत असताना पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केली अटक
SSC-HSC Exam :बोर्डाकडून राज्यात कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षांसाठी २० ते २६ जानेवारी या कालावधीत जनजागृती सप्ताह असेल. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी आणि दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.
Pune : भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या, घरमालकांना आदेशपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशानुसार, घरमालकांनी भाडेकरूंच्या ओळखी, पत्ता आणि इतर महत्त्वाची माहिती पोलिसांना सादर करणे आवश्यक आहे. संभाव्य गुन्हेगारी व समस्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
किल्ले राजगड आणि तोरणागडावर बिबट्याचा मुक्त संचार; पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणकिल्ले तोरणागड आणि मेटपिलावरे (ता. राजगड) परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या परिसरात दिवसा दिसून येत आहे, ज्यामुळे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोरणागडावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये बिबट्याचा चित्रीकरण केला आहे. यामुळे वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
रायगडमध्ये पालमंत्रीपदावरून नाराजीनाट्य, गोगावलेंच्या समर्थकांनी रोखला महामार्गराज्यात कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याची यादी जाहीर झालीय. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद पेटला आहे. आदिती तटकरे यांना जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलंय. तर शिवसेनेच्या भरत गोगावले यांना कोणत्याच जिल्ह्याचं पालकमंत्री केलेलं नाहीय. यामुळे गोगावले समर्थकांनी नाराजी व्यक्त करत महामार्ग रोखण्यात आला होता.
Weather Update : राज्यात अवकाळीचे संकट, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला इशाराराज्यात अवकाळी पावसाचे संकट असून काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.