लक्ष्मी डेंटलची शेअर बाजारात जोरदार एन्ट्री, गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर २३ टक्क्यांपर्यंत परतावा
मुंबई : दंत उत्पादनांचे डिझाइन, उत्पादन आणि वितरण प्रदान करणारी ऑर्बिमेड-समर्थित कंपनी लक्ष्मी डेंटलच्या शेअर्समध्ये आजपासून व्यवहार सुरू झाला आहे. कंपनीचा शेअर आज बीएसई वर ५२८ रुपयांना सूचीबद्ध झाला, तर आयपीओची किंमत ४२८ रुपये होती. म्हणजेच शेअरने गुंतवणूकदारांना लिस्टिंगवर २३ टक्के किंवा प्रति शेअर १०० रुपये नफा दिला आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला, तर ग्रे मार्केटमधील प्रीमियम शेअर्सची मजबूत लिस्टिंग दर्शवत होता. आयपीओचा आकार ६३८ कोटी रुपये होता, तर त्याला ४३८२२.२० कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. आयपीओ ११४ पट सबस्क्राइबलक्ष्मी डेंटलच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा आयपीओ एकूण ११४ पेक्षा जास्त पट सबस्क्राइब झाला. आयपीओचा १० टक्के भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव होता आणि तो एकूण ७५.१ पट सबस्क्राइब झाला. तसेच, आयपीओमधील १५ टक्के भाग बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) राखीव ठेवण्यात आला होता आणि तो एकूण १४७.६९ पट सबस्क्राइब झाला. तर त्यातील ७५ टक्के जागा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) राखीव होती आणि तो एकूण ११०.३८ पट भरला गेली. आयपीओचा आकार ६३८ कोटी रुपये होता, तर त्याला ४३८२२.२० कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या. आयपीओतून उभारलेला निधी कशासाठी वापरणार?सेबीकडे दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार नवीन इक्विटीद्वारे उभारण्यात आलेला निधी कर्जाची परतफेड करण्यासाठी, भांडवली खर्चाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्याच्या उपकंपनी बिझडेंट डिव्हाइसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. आयपीओचे व्यवस्थापकलक्ष्मी डेंटल आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर नुवामा वेल्थ मॅनेजमेंट, मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स, एसबीआय कॅपिटल मार्केट्स होते आणि एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड रजिस्ट्रार होते. कंपनी काय करते?लक्ष्मी डेंटल ही एक एकात्मिक दंत उत्पादने कंपनी आहे, जी जुलै २००४ मध्ये सुरू झाली. कंपनी डिझाइन आणि उत्पादनापासून ते दंत उत्पादनांच्या वितरणापर्यंत सर्व काही पुरवते. कंपनी कस्टम क्राउन आणि ब्रिज, क्लिअर अलाइनर्स, थर्मोफॉर्मिंग शीट्स आणि पेडियाट्रिक डेंटल सारखी उत्पादने तयार करते. कंपनीची आर्थिक स्थिती कशी?कंपनीच्या आर्थिक बाबींबद्दल बोलायचे झाले तर २०२३ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल आणि खर्च अनुक्रमे १६३.८४ कोटी रुपये आणि १६७.७६ कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीला ४.१६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. २०२४ या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल आणि खर्च अनुक्रमे १९५.२६ कोटी आणि १८६.६६ कोटी रुपये होता, तर या काळात कंपनीने २५.२३ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. २०२५ या आर्थिक वर्षात सप्टेंबर अखेरपर्यंत म्हणजेच ६ महिन्यांत कंपनीचा नफा २२.७४ कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत महसूल आणि खर्च अनुक्रमे ११७.९९ कोटी आणि १०३.४१ कोटी रुपये होता.