Latest Maharashtra News Updates : दहा वर्षांनी मिळाला न्याय ! डोक्यात दगड घालून खून करणाऱ्याला सात वर्षं सक्तमजुरीची शिक्षा
esakal January 20, 2025 09:45 PM
Pune Live : दहा वर्षांनी मिळाला न्याय ! डोक्यात दगड घालून खून करणाऱ्याला सात वर्षं सक्तमजुरीची शिक्षा

पुण्यातील वडकी येथे 2015 मध्ये घडलेल्या गुन्ह्याचा अखेर निकाल लागला. न्यायालयाने आरोपीला सात वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. भीमराव यशवंत खांडे (वय ५५, रा. वडकी, खोकेनगर, मुळ रा. गिरवी, सातारा) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. हात उसने घेतलेले १०० रुपये सातत्याने परत मागत असल्याने झालेल्या वादातून ओळखीच्या व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केला होता.

RG Kar Doctor Rape Verdict : "त्याला मृत्युदंड द्या" - कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची मागणी

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही सुरुवातीपासून मृत्युदंडाची मागणी करतोय. आरोपीला मृत्युदंडच व्हायला हवा." असं त्या म्हणाल्या.

Vita Live : विट्यातील शासकीय निवासी शाळेत २४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

विटा येथील शासकीय निवासी शाळेतील ११ ते १५ वयोगटातील इयत्ता सहावी ते दहावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या २४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असून त्यांना विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे - रूपाली चाकणकर

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे - रूपाली चाकणकर

इथल्या कामासाठी मी गावी आलो - एकनाथ शिंदे

दरेगावात कामासाठी मी आलो आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले आहे.

तरुण हे देशाची संपत्ती आहेत, जे राष्ट्र उभारणी आणि समृद्धीत योगदान देतील - राजनाथ सिंह

तरुण हे देशाची संपत्ती आहेत, जे राष्ट्र उभारणी आणि समृद्धीत योगदान देतील - राजनाथ सिंह

Mumbai Live : अक्षय शिंदे प्रकरणातील पाच पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव होता - अनिल देशमुख

ज्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, त्यावर नेमका दबाव कोणाचा होता? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे. अक्षय शिंदे हा खरच आरोपी होता की आणखी कोण होतं? आपटेला वाचवण्यासाठी हा फेक एन्काऊंटर झाला का? कोर्टाला सादर केलेल्या अहवालात आणखी काय आहे? ती माहिती जाणून घेतली आहे. या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावरूनच स्पष्ट होईल का या पोलीस कर्मचाऱ्यावर नेमका दबाव कोणाचा होता?

Kolhapur Live : ज्योतिबा देवस्थानात देवाच्या मुर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरु होणार

कोल्हापुरातील ज्योतिबा देवस्थानातील देवाच्या मुर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरु होणार आहे. याप्रक्रियेदरम्यान मूळ मुर्तीचं दर्शन होणार आहे.

LIVE : संभाजीनगरमध्ये 10 हजारांपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10 हजारपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक आहेत, त्यात सर्वाधिक बांगलादेशी हे एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यासाठी आज किरीट सोमय्या यांनी थेट सिल्लोड गाठून उपविभागीय अधिकारीकडून माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.

Live : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलीसच जबाबदार; न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिस जबाबदार असल्याचं समोर आलंय...यासंदर्भातला न्यायालयीन चौकशीचा अहवाल मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलाय....या क्षणाची मोठी बातमी

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिस जबाबदार

अक्षय शिंदेच्या मृत्यूला 5 पोलिस जबाबदार

आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद

बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत

Mumbai Live : सैफवरील हल्लेखोराला वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेलं... 'या' गोष्टींची होणार चौकशी

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला पांढरे पोलीस हे सांताक्रुज लॉक अप मधून वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी घेऊन आले आहेत. आरोपीने सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्या त्या दिवसापासून अटक होईपर्यंत आरोपीला कोणी कोणी मदत केली हल्ला करतेवेळी घातलेल्या कपड्यावर रक्ताचे शिंतोडे उडाले होते टी-शर्ट देखील आरोपीने फेकून दिले आहे त्याचा देखील पोलिसांना शोध घ्यायचा आहे शिवाय मुंबईत आल्यानंतर आरोपी हाउसकीपिंग चा काम देखील करत होता त्याला इथे काम मिळवून देण्यात कोणी मदत केली अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळवायचे आहेत यासाठी आता आरोपीची वांद्रे पोलीस ठाण्यास चौकशी सुरू आहे.

Delhi Live : राहुल गांधींविरोधातील खटल्याला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या विधानाबाबतचा राहुल गांधींविरोधातील खटल्याला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधी यांनी प्रचार सभेत अमित शहा यांचा उल्लेख मारेकरी असा केला होता.

Uday Samant Live : एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणाही वाद निर्माण करु नयेत- उदय सामंत

एकनाथ शिंदेंना डावलून उदय सामंत यांना शिवसेनत पुढे आणले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे.यावर एकनाथ शिंदे आणि माझ्यात कोणाही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असे उदय सामंत यांनी दावोसवरुन व्हिडिओ जारी करुन सांगितले म्हटले आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेणार

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शरद पवारांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Rahul Gandhi Live : राहुल गांधींना मानहानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा दिलासा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत खटल्याच्या कामकाजावर अंतरिम स्थगिती दिली आहे.

Jalana Live : मराठा आंदोलकांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले

अजित पवार हे जालना दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्याला मराठा आंदोलकांनी जालन्यात काळे झेंडे दाखवले

Pune Live : पुण्याच्या बिबवेवाडीत डाॅक्टर तरुणीने जीवन संपविले

पहिलं लग्न झालेलं असतानाही आपण अविवाहित असल्याचं भासवून एका तरुणाने डॉक्टर युवतीला लग्नाचं आमिष दाखवलं. नंतर तिच्याकडून पैसे उकळले. याच नैराश्यातून तिने जीवन संपविले.

New Delhi Live : महापालिका निवडणुकीबाबतची22 जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता

महापालिका निवडणुकीबाबतची22 जानेवारीला होणारी सुनावणी पुढे ढकलण्याची शक्यता आहे.

Anajali Damania : सुदर्शन घुलेवर 8 एफआयआर, अजंली दमानियांचा आरोप

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेवर 8 एफआयआर असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

Beed Live : वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकोका लागलेल्या वाल्मीक कराडला खंडणी प्रकरणात मकर संक्रांतीच्या दिवशी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

RTI Live: राज्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून अर्जाचा पाऊस

अवघ्या पाच दिवसांत ८९ हजारांवर अर्ज

राज्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून अर्जाचा पाऊस

पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली

आणि अवघ्या पाच दिवसांमध्ये तब्बल ८९ हजारांहून अधिक अर्ज आरटीई लॉटरीसाठी दाखल झाले.

येत्या २७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी असल्यामुळे पालकांना आपल्या मुलांचे अर्ज भरण्यासाठी आणखी नऊ दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Live: पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी

पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये एकूण मंजूर कर्मचाऱ्यांपैकी निम्मेच कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती समोर

यामुळे कामाचा प्रचंड ताण पडत असून, वाहतूक सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत.

आकडेवारीनुसार, पीएमपीच्या आस्थापनेवर एकूण १५ हजार ५१९ मंजूर पदांपैकी केवळ ७ हजार ८५१ कर्मचाऱ्यांवर काम सुरू असून,

Pune Live: एमपीएससीमार्फत ३२० रिक्त जागांसाठी भरती

एमपीएससीमार्फत ३२० रिक्त जागांसाठी भरती

२१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार…

१० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार अर्ज

या भरतीअंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

Kolhapur Live: दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा च्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया

दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा च्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया

श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवणार

मंगळवार दिनांक 21 ते शुक्रवार दिनांक 24 जानेवारी या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.