नवी दिल्ली : देशातील प्रत्येक लहान-मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर हे वेगवेगळे असतात. तसेच वेगवेगळे कर लावून सोने-चांदी विकली जात असल्यामुळे सर्वसामान्यांना सोने किंवा चांदी विकत घेणे सध्या परवडताना दिसत नाही. मात्र आता सोन्या-चांदीचे दर कमी होऊ शकतात. कारण संपूर्ण देशात लवकरच ‘वन नेशन, वन रेट’ धोरण लागू होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. संपूर्ण देशात सर्व वस्तूंसाठी एकच दर लागू झाला तर नागरिकांना देशातील कोणत्याही लहान-मोठ्या शहरातून एकसमान दराने सोनं खरेदी करता येणार आहे. यामुळे ज्वेलर्सच्या मनमानी कारभाराला चाप बसणार असून सोन्याचे दरही कमी होऊ शकतात. असे असले तरी देशभरातील सर्व मोठ्या बड्या ज्वेलर्सनी या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आहे. (One Nation One Rate policy likely to bring gold prices uniform across the country)
देशातील प्रत्येक शहरात सोन्याच्या दरात 200 ते 500 रुपयांचा फरक पाहायला मिळतो. विविध करांमुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरात सोन्याची किंमत सारखीच ठेवण्यासाठी ‘वन नेशन, वन रेट’ धोरणाच्या माध्यमातून प्रस्ताव ठेवला जाणार आहे. ‘वन नेशन, वन रेट’ धोरणावर बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अनेक ज्वेलर्स असोसिएशन या धोरणाशी सहमत असून लवकरात लवकर या धोरणाची अंमलबजावणी करावीस अशी मागणी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे जेम अँड ज्वेलरी कौन्सिलनेही या धोरणाला पाठिंबा दिला आहे. मात्र, केंद्र सरकार या धोरणाबाबत अंतिम निर्णय कधी घेणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचा – Maharashtra Weather : राज्यात तापमानात चढ-उतार, हवामान विभागाचा अंदाज काय?
केंद्र सरकारला ‘वन नेशन, वन रेट’ या धोरणाच्या माध्यमातून संपूर्ण देशातील सोन्याच्या किमती एकसमान करायच्या आहेत. या धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर देशातील कोणत्याही लहान-मोठ्या शहरातून सोनं खरेदी करताना एकसमान किंमत मोजवी लागणार आहे. या धोरणांतर्गत सरकार नॅशनल बुलियन एक्स्चेंज तयार करेल, जे सर्वत्र सोन्याच्या एकसमान किमत ठरवेल. महत्त्वाचे म्हणजे एकदा किंमत ठरल्यानंतर देशातील सर्व ज्वेलर्संना त्यात किमतीत सोनं विकावं लागणार आहे. यामुळे ज्वेलर्संच्या मनमानी कारभाराला चाप बसणार असून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सोन्याचे दर वाढवता किंवा कमी करता येणार नाहीत. तसेच हे धोरण लागू झाल्यानंतर ज्या शहरात सोनं महाग मिळत आहे, तेथील ज्वेलर्संना दर कमी करावा लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 74 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या (MCX)आधारे ठरवले जातात. प्रत्येक शहरातील ज्वेलर्स असोसिएशनचे व्यापारी शेअर मार्केट उघडण्याच्या वेळी मागणी, पुरवठा, जागतिक बाजारपेठ आणि महागाई लक्षात घेऊन एकत्रितपणे किंमत ठरवतात. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. तसेच प्रत्येक शहरातील ज्वेलर्स सोन्याचे वेगवेगळे दर ठरवतात. मात्र आता ‘वन नेशन, वन रेट’ धोरणामुळे सोन्याच्या किमतीत तपावत येईल, यामुळे सोन्याचे दरही कमी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – Public Transport : मुंबईकरांची सोय, एकाच तिकिटावर प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध होणार