काळानुरुप क्रिकेटमध्ये बराच बदल होत गेला आहे. आतापर्यंत दुबळे समजले जाणारे संघही तोडीसतोड सामना करत आहे. याची प्रचिती अंडर 19 टी20 वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत आली. या स्पर्धेत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या नायजेरियन संघाने बलाढ्य न्यूझीलंड संघाचा धुव्वा उडवला. या विजयासह नायजेरियन संघाने क्रिकेटविश्वात इतिहास नोंदवला आहे. या सामन्यात न्यूझीलंड सहज जिंकेल असं वाटत होतं. पण नायजेरियन संघ दोन धावांसाठी न्यूझीलंड संघावर भारी पडला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या क कटात न्यूझीलंड आणि नायजेरिया आमनेसामने आले होते. या सामन्यात पावसामुळे खंड पडला आणि 13-13 षटकांचा हा सामना करण्यात आला. नायजेरियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 13 षटकात 6 गडी गमवून 65 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी विजयासाठी दिलेलं 66 धावांचं आव्हान सहज सोपं आहे असं वाटत होतं. पण या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची धाव 63 धावांपर्यंत पोहोचली. न्यूझीलंडने 13 षटकात 6 गडी गमवून 63 धावा केल्या.
न्यूझीलंडने 12 षटकात 5 गडी गमवून 57 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात विजयासाठी 9 धावांची आवश्यकता होती. ताश वाकेलीन आणि आयन लाम्बट ही जोडी मैदानात होती. पहिल्या चेंडूवर आयनने 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर वाकेलीनने 1 धावा, तिसऱ्या चेंडूवर आयनने पुन्हा एक धाव, चौथ्या चेंडूवर वाकेलीनने पुन्हा एक धाव घेत आयनला स्ट्राईक दिली. त्यामुळे शेवटच्या दोन चेंडूवर विजयासाठी 5 धावांची आवश्यकता होती. पण पाचवा चेंडू आयनने निर्धाव घालवला आणि स्थिती एक चेंडू पाच धावा अशी आली. पण सहा चेंडूवर आयनने मारलेल्या चेंडूवर दोन धावा आल्या आणि तिसरी धाव घेताना वाकेलीन धावचीत झाली. यामुळे 6 गडी बाद 63 धावा करता आल्या. तसेच बरोबरी साधण्यासठी दोन धावा आणि जिंकण्यासाठी 3 धावा कमी पडल्या. हा सामना नायजेरियाने 2 धावांनी जिंकला.
न्यूझीलंड महिला अंडर-19 प्लेइंग 11: एम्मा मॅक्लिओड, केट इर्विन, इव्ह वोलँड, अनिका टॉड, टॅश वेकलिन (कर्णधार), डार्सी रोज प्रसाद, इओन लॅम्बॅट, एलिझाबेथ बुकानन (विकेट कीपर), हन्ना फ्रान्सिस, अनिका टॉवरे, हन्ना ओ’कॉनर.
नायजेरिया 19 वर्षांखालील महिला प्लेइंग 11: विचित्र एग्बोया, लकी पिएटी (कर्णधार), अदेशोला अडेकुंले, क्रिस्ताबेल चुकव्युओनी, उसेन पीस, लिलियन उडे, व्हिक्ट्री इग्बिनेडियन, डेबोरा बासी (विकेटकीपर), अनोळखी अखिग्बे, मुहिबत अमुसा, ओमोकन्स.