टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पूर्णपणे तयार झाली आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या गोटात कही खुशी कही गम सारखं वातावरण आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर आणि टी20 क्रिकेटमध्ये 26 महिन्यानंतर मोहम्मद शमीचं पुनरागमन झालं आहे. तर जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत अजूनही चिंतेचं वातावरण आहे. पण यात आता एका फोटो आणखी भर पडली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. टी20 मालिका 22 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये मोहम्मद शमीने भाग घेतला. या ट्रेनिंग सेशनमधील फोटो पाहिला तर क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. सराव शिबीरात नेमकं असं काय झालं की टेन्शन वाढलं आहे. त्याचं झालं असं की, मोहम्मद शमी सरावादरम्यान गुडघ्याला पट्टी बांधून मैदानात उतरला होता. इतकंच काय तर हाताच्या पंजालाही पट्टी बांधली होती. त्यामुळे तो फिट आहे की अनफिट असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. कारण अशा पट्ट्या बांधून सराव करणं हे काही फिट खेळाडूचं लक्षण नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
मोहम्मद शमीला वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेनंतर गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षाभरापासून तो क्रिकेट मैदानापासून दूर होता. आता 14 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार असून 26 महिन्यानंतर हा फॉर्मेट खेळणार नाही. मोहम्मद शमीने नोव्हेंबर 2022 मध्ये शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. कोलकात्यात प्रॅक्टिस करताना शमीने हाताला पट्टी बांधली होती. पण सराव करताना कुठेच दुखापत आहे असं जाणवलं नाही. तो गोलंदाजी करताना व्यवस्थित रनअप घेत असल्याचंही दिसून आलं. त्यामुळे भारतासाठी सध्यातरी काहीच टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याला झालेली दुखापत पुन्हा त्रास देऊ नये इतकीच प्रार्थना करावी लागेल. कारण टी20, वनडे मालिकेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी खूपच महत्त्वाची आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (फीटनेस), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग,यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.