अल्पावधीत एका लाखाचे झाले १४ लाख! कंपनीच्या शेअर्सची गेल्या ७ सत्रात सलग अप्पर सर्किटला धडक; काय आहे कारण जाणून घ्या
ET Marathi January 21, 2025 12:45 PM
मुंबई : सोमवारी, २० जानेवारी रोजी शेअर बाजाराने आठवड्याची सुरूवात चांगल्या तेजीसह केली. यामध्ये अनेक शेअर्सने वरच्या सर्किटलाही स्पर्श केला. असाच एक शेअर म्हणजे इराया लाइफस्पेस होय. या कंपनीच्या शेअर्सने सलग सातव्या व्यापारी सत्रात ५ टक्क्यांच्या वरच्या सर्किटला धडक दिली असून कंपनीच्या शेअर्समधील या तेजीमागे एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारक आणि बीएसईच्या मंजूरी नंतर २,७०,००,००० परिवर्तनीय वॉरंट वाटपाची घोषणा केली आहे. हे वाटप यामध्ये जस्ट राईट लाईफ लिमिटेड (१.५ कोटी वॉरंट), विकास गर्ग (५० लाख वॉरंट), विकास लाईफकेअर लिमिटेड (५० लाख वॉरंट) आणि पी के गुप्ता (२० लाख वॉरंट) यांचा समावेश आहे. प्रत्येक वॉरंट धारकाला किती रक्कम भरावी लागेल?Eraaya Lifespaces कंपनीने जारी केलेले वॉरंट प्रत्येक वॉरंट धारकाला इश्यूच्या २५ टक्क्यांची रक्कम भरल्यानंतर एका इक्विटी शेअरसाठी सबस्क्राइब करण्याचा अधिकार देतो. उर्वरित रक्कम १८ महिन्यांच्या आत भरता येईल आहे. कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत, वॉरंट प्राधान्यक्रमानुसार जारी केले जातात आणि सेबीच्या नियमांनुसार लॉक-इन कालावधीच्या अधीन असतात. दरम्यान, कंपनीने डिसेंबरमध्ये सांगितले की, तिची भारतीय उपकंपनी एबिक्सकॅश, ही एका व्यापक तिकीट कराराचा भाग म्हणून स्मार्ट इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन (ETM) च्या पुरवठा, कमिशनिंग आणि देखभालीसाठी तंत्रज्ञान करार प्रदाता म्हणून कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (KSRTC) ने निवडली आहे. इराया लाइफस्पेस शेअरची कामगिरीगेल्या काही महिन्यांत हा शेअर सातत्याने ५ टक्क्यांची अप्पर सर्किट लिमिट गाठत असल्याने शेअरधारकांच्या संपत्ती मजबूत वाढ होत आहे. गेल्या एका वर्षात शेअरमध्ये ७५६ टक्के वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी या शेअरची किंमत १५ रुपये होती. गेल्या दोन वर्षांत त्याने १४,४६१ टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत या शेअरमध्ये १५,८८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ पासून हा शेअर १:१० च्या प्रमाणात एक्स-स्प्लिट आधारावर व्यवहार करत आहे. ट्रेंडलाइनच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, ऑक्टोबर २०२४ अखेर कंपनीमध्ये सामान्य जनतेची ३६.७ टक्के भागिदारी आहे, तर प्रवर्तकांचा ३५.२ टक्के आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) २६.८३ टक्के भागिदारी आहे. इराया लाइफस्पेसची आर्थिक स्थितीसप्टेंबर २०२४ तिमाहीमध्ये कंपनीची निव्वळ विक्री १.२४ कोटी रुपये झाली, जी सप्टेंबर २०२३ मधील २३६.१५ कोटी रुपयांवरून ९९.४७ टक्क्यांनी कमी आहे.सप्टेंबर २०२४ मध्ये तिमाही निव्वळ नफा ०.०३ कोटी रुपये झाला, जो सप्टेंबर २०२३ मधील ०.०६ कोटी रुपयांवरून ५१.१३ टक्क्यांनी कमी आहे.सप्टेंबर २०२४ मध्ये EBITDA ०.३४ कोटी रुपये झाला, जो सप्टेंबर २०२३ मधील ०.०६ कोटी रुपयांवरून ४६६.६७ टक्क्यांनी वाढला.सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत इराया लाइफची प्रति शेअर कमाई (EPS) सप्टेंबर २०२४ मध्ये ०.०२ रुपये झाली सप्टेंबर २०२३ मधील ०.०८ रुपये होती.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.