दिल्लीत बुधवारी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान पार पडले. आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाली. दिल्लीत एकूण 1 कोटी 56 लाख मतदार आहेत. दिल्लीत मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलनुसार अरविंद केजरीवाल यांना सर्वात मोठा झटका बसताना दिसत आहे. दिल्लीत भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या पत्राची कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांनी घेतली दखलकल्याण पूर्वचे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड हे सध्या गोळीबार प्रकरणी तुरुंगात आहेत. त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते जवळपास एका वर्षांपासून तुरुंगातच आहेत. आता त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील रस्ते विकासकामं मार्गी लावण्यासाठी मागच्या वर्षी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना पाठवलेल्या पत्राची दखल घेतली आहे. पालिका प्रशासनाने गायकवाड यांच्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी पावले उचलली आहेत.
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना, राज्य सरकार अलर्ट, नाशिकमध्ये घेणार खबरदारीउत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाल्याची माहिती समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आता राज्य सरकार अलर्ट झालं असून नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष खबरदारी घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारकडून नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गृह सचिव, पालक सचिव यांच्या पाठोपाठ आता विभागीय आयुक्तस्तरीय बैठकांचा धडका सुरु असून नियोजनवर भर दिला जात आहे.
Manoj Jarange : आता गनिमी कावा, मुंबईकडे येणार; मनोज जरांगेंचा इशारामराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला आरक्षणावरून पुन्हा इशारा दिला आहे. उपोषण करून हाडं झिजली आहेत. आता गनिमी कावा करणार असून, लवकरच मुंबईला मराठ्यांना घेऊन धडकरणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
Amravati Politics : कम्युनिस्ट पक्षाकडून अमरावती इथं केंद्रीय अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी Amravati Politicsकेंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी यांच्याबाबत कुठल्याही प्रकारे धोरण आखल्या गेलं नाही, असा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेने अर्थसंकल्पाची प्रतिकात्मक होळी केली. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय इथं हे आंदोलन करण्यात आलं.
Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर ही औरंगाजेबाची औलाद, गोळ्या घातल्या पाहिजे; उदयनराजे भोसलेराहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानावर खासदार उदयनराजे भोसले कडाडले आहे. ते म्हणाले, "राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या घोडचुकीला माफी नाही. शिवरायांनी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. राहुल सोलापूरकर ही औरंगाजेबाची औलाद आहे. अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे. सोलापूरकरला गोळ्या घालून मारलं पाहिजे".
Devendra Fadnavis : संतोष देशमुखसारख्या घटना खपवून घेणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशाराबीड जिल्ह्यात दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुखसारख्या घटना खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा होणारच, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
Devendra Fadnavis : सुरेश धस आधुनिक भगीरथ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसभाजप आमदार सुरेश धस यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक भगीरथ, असा उल्लेख केला आहे. बीडमधील आष्टी तालुक्यातील दुष्काळ भूतकाळ होणार, हा मला विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाईल. 2014-15 मध्ये महाराष्ट्र दुष्काळ होता. आता मराठवाडा दुष्काळमुक्त करू, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Pankaja Munde : मी गोपीनाथ मुंडेंची लेक, बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही; पंकजा मुंडेंचं सूचक विधानबीड जिल्ह्यात सहा पैकी पाच आमदार जिंकले की, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतात. फडणवीसांबद्दल नेहमीच आदर राहिला आहे. मी सुद्धा मुख्यमंत्र्यांची लाडकी आहे. मला सुरेध धस अण्णांनी घरगुती कार्यक्रमासाठी बोलवल्यास नक्की जाईल, असे मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले.
Suresh Dhas Latest News : सुरेश धस यांचे भाषणमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आष्टीत विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी आम्हाला केवळ फडणवीसांकडून अपेक्षा आहेत, दुसऱ्यांकडून नाहीत, असे विधान केले. मी बोललो की बीडची बदनामी होते, असा आरोप केला जातो, असेही धस यांनी म्हटले आहे. यावेळी व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित आहेत.
Dhananjay Munde News : मुंडे गैरहजर का?मुख्यमंत्री पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर असूनही मंत्री धनंजय मुंडे गैरहजर का, यावरून चर्चांना उधाण आले आहे. डोळ्यांच्या ऑपरेशनमुळे ते फडणवीस यांच्या कार्यक्रमांना गैरहजर असल्याचे सांगितले जात आहे.
Devendra Fadnavis in Beed : आष्टीत विविध कार्यक्रममुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच बीडमध्ये दाखल झाले आहेत. आष्टीमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. हा मतदारसंघ आमदार सुरेश धस यांचा आहे. यावेळी व्यासपीठावर मंत्री पंकजा मुंडेही उपस्थित आहेत. मात्र, मंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमाला हजर नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अनेक आरोप होत आहेत.
Rahul Solapurkar News : शिवसेना आक्रमकअभिनेते राहुल सोलापुरकर यांच्याविरोधात पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. सोलापूरकर यांनी नुकतेच शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्याबद्दल सोलापूरकर यांनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. आज पक्षाकडून सोलापूरकरांच्या घराबाहेर आंदोलन केले जात आहे.
Pune Latest Update : शिवजयंतीनिमित्त एकेरी वाहतूककिल्ले शिवनेरी येथील शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत जुन्नर शहर व परिसरात काही मार्गांवर एकेरी वाहतुकीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
Shirish Maharaj More Suicide : शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्याशिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज होते. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Devendra Fadnavis : धसांच्या अष्टीत मुख्यमंत्री फडणवीसांचा दौराआज आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
पंतप्रधान मोदींनी केले त्रिवेणी संगमावर शाहीस्नान; मंत्रोच्चार करत ध्यान केले.पंतप्रधान मोदींनी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर शाहीस्नान केले. पूजा केल्यानंतर हातात रुद्राक्षाची माळ घेऊन पंतप्रधान मोदींनी संगमात डुबकी मारली. याआधी 6 वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदींनी संगममध्ये स्नान केले होते.
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचं शाहीस्नानPM मोदींचे थोड्याच वेळात महाकुंभात शाहीस्नान. विशेष बोटीने पंतप्रधान शाहीस्नानासाठी रवाना.
Pm Modi in Maha Kumbh Prayagraj visit : PM मोदी प्रयागराज पोहोचले आहेत; विमानतळावर मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केलंपंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराजला पोहोचले आहेत.थोड्याच वेळात महाकुंभात शाहीस्नान यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहतील.
Delhi Election 2025 Voting LIVE: आतापर्यंत ८.३० टक्के मतदानदिल्ली विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत ८.३० टक्के मतदान झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दिल्लीतील जनतेला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 'दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होईल. मतदारांना लोकशाहीच्या या उत्सवात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचे आणि त्यांचे मौल्यवान मतदान करा," असे मोदींनी म्हटलं आहे.पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व तरुण मित्रांना माझ्या शुभेच्छा, असे त्यांनी 'X'वर म्हटलं आहे.
Satara News Live: संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या यांच्या बंगल्यावर छापामाजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्स विभागाचा छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास इन्कमटॅक्स विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर पोहचले आहेत. त्यांच्या बंगल्याची झाडाझडती सुरु आहे.
Delhi CM AAP National Convener: केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखलदिल्ली विधानसभा मतदानाला सुरवात होण्यापूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला (मंगळवारी) केजरीवाल यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. कुरुक्षेत्रच्या शाहाबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला होता. हरियाणा सरकारवर त्यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते
Devendra Fadnavis on Beed tour : CM फडणवीस बीड दौऱ्यावर पण धनंजय मुंडे गैरहजरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, या कार्यक्रमाला धनंजय मुंडे गैरहजर राहणार आहेत. त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्यामुळे ते गैरहजार राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
MHADA : 'म्हाडा'च्या 2264 घरांसाठी आज सोडतम्हाडा'च्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी आज लॉटरी काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात दुपारी ही लॉटरी काढली जाणार आहे.
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज महाकुंभमेळ्यात जाणारपंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाकुंभमेळ्यात जाणार आहेत. त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर ते गंगा नदीची पूजा करणार आहेत. मोदी प्रयागराजमध्ये दोन तास राहणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. नरेंद्र मोदीसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहणार आहे.
Delhi Assembly Election : विधानसभेसाठी आज दिल्लीत मतदानदिल्ली विधानसभेच्या सत्तर जागांसाठी आज कडेकोट बंदोबस्तात मतदान पार पडणार आहे. दिल्लीत यंदा आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजप या तीन पक्षात प्रमुख लढत होणार आहे. तर मतदार पुन्हा एकदा केजरीवालांच्या हाती सत्ता देणार की सत्तांतर होणार याचा फैसला आज होणार आहे.