Emergency OTT Release : कंगना रणौत यांचा 'इमर्जन्सी' घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार, कुठे अन् कधी जाणून घ्या…
Saam TV January 21, 2025 01:45 PM

सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut ) यांचा 'इमर्जन्सी' (Emergency ) चित्रपट पाहायला मिळत आहे. या चित्रपटात कंगना रणौत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील कंगना यांचे काम चाहत्यांना खूप आवडले आहे. या चित्रपटात अनुपम खेरही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहे.

'इमर्जन्सी' ओटीटी

बॉलिवूड अभिनेत्री रणौत यांचा 'इमर्जन्सी' चित्रपट 17 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. थिएटर गाजवल्यानंतर कंगना रणौत यांचा 'इमर्जन्सी'चित्रपट घरबसल्या ओटीटीवर पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'इमर्जन्सी' चित्रपटाचे स्ट्रीमिंग राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहे. आता हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्म पाहता येणार आहे. मात्र अद्याप कोणत्याही तारखेची अधिकृत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

'इमर्जन्सी'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

कंगना रणौत यांचा '' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिस आपली जादू दाखवत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'इमर्जन्सी' चित्रपटाचे आतापर्यंत एकूण कलेक्शन 11.28 कोटी रुपये झाले आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली.

'इमर्जन्सी' चित्रपटात श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, सतीश कौशिक असे तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरनेच चाहत्यांना सर्वप्रथम भुरळ घातली होती. 'इमर्जन्सी' चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत यांनी स्वतः केले आहे. कंगना रणौत यांचा 'इमर्जन्सी' चित्रपट भविष्यात मोठी कमाई करेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.