Sprout Makhana Tikki Recipe: सकाळी नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यदायी असते. पण तुम्हाला मोड आलेले कडधान्य खायचे नसेल तर त्यापासून स्वादिष्ट पदार्थ तयार करू शकता. स्प्राउट आणि भाजलेला मखाना मिक्स करून टिक्की तयार करू शकता. ही टिक्की खायला पौष्टिक आणि चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया स्प्राउट टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
स्प्राउट मखाना टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्यभाजलेला मखाणा
मोड आलेले मुग
लसूण
हिरवी मिरची
पनीर
कांदा
शिमला मिरची
मीठ
काळी मिरी
कोथिंबीर
गाजर
तेल
भाजलेला मखाणा, मोड आलेले मुग , लसूण, हिरवी मिरची मिक्सरमध्ये चांगले बारिक करावे. नंतर बारिक केलेले साहित्य एका बाऊलमध्ये काढा. नंतर त्यात बारिक किसलेला पनीर, बारिक चिरलेला कांदा, शिमला मिरची, मीठ, काळी मिरी, कोथिंबीर, किसलेला गाजर सर्व चांगले मिक्स करा. नंतर गोलाकारात टिक्की तयार करून घ्यावे. नंतर पॅनमध्ये तेल टाकून गरम करा आणि टिक्की दोन्ही बाजूने शॅडोफ्राय करून घ्या. गरमा गरमा आस्वाद घेऊ शकता.