Yuzvendra Chahal Viral Post : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल व पत्नी धनश्री वर्मा घटस्फोटाच्या चर्चेमुळे मागचे काही दिवस चर्चेच्या क्रेंद्रस्थानी आहेत. दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केले आणि घटस्फोटाच्या चर्चांनी वेग धरला. ने तर धनश्री सोबतचे फोटोज देखील डिलीट केले. सुत्राने घटस्फोटाची बातमी दिली आणि सोशल मीडियावर घटस्फोटाची चर्चा रंगली. व चहलने मात्र तसा स्पष्ट खुलासा केला नाही.
त्यानंतर चहल मुंबईत एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला आहे आणि चहलनेही कॅमेरा पाहताच चेहरा लपवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे. पण, त्यात तो चहलच आहे का हे स्पष्टपणे दिसत नाही. तिचे नाव आरजे महावश सांगितले जात आहे. आरजे महावशसोबत चहल हॉटेलमध्ये पार्टी करताना देखील पाहायला मिळाला.
अशात आता चहलच्या नव्या पोस्टमुळे सोशल मीडियावरील चर्चांना उधाण आले आहे. चहलच्या या पोस्टनंतर धनश्री-चहलमध्ये वाद झाले असल्याचे आणखी स्पष्ट झाले आहे. चहलने सेल्फी पोस्ट करत " खरं प्रेम दुर्मिळ आहे आणि माझं नाव दुर्मिळ आहे," असा कॅप्शन लिहिला आणि नेटकऱ्यांना चर्चेसाठी आणखी एक मुद्दा दिला. या पोस्टनंतर चाहते चहलला, चहल भाई ऐवजी रेअर भाई म्हणत आहेत.
लॉकडाऊन दरम्यान युझवेंद्र आणि धनश्री वर्मा यांची पहिली भेट झाली. धनश्रीने एका रिॲलिटी शोमध्ये सांगितले होते की, चहलने तिच्याशी डान्स शिकण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर नात्याचे रुपांतर प्रेमात झाले. चहल आणि धनश्रीचे डिसेंबर २०२० मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले.