Sushma Andhare advice to new state election commissioner Dinesh Waghmare
Marathi January 23, 2025 12:24 AM


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुषमा अंधारे यांनी दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पण त्यांनी त्यांना महत्त्वाचा सल्ला देखील दिला आहे.

मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तपदी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी (ता. 20 जानेवारी) दिनेश वाघमारे यांच्या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना जारी केली. राज्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजीकच्या काळात होण्याची शक्यता वाढली आहे. परंतु, वाघमारे यांच्या नियुक्तीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. (Sushma Andhare advice to new state election commissioner Dinesh Waghmare)

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुषमा अंधारे यांनी दिनेश वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” दिनेश वाघमारेसर… अभिनंदन! आपल्याला या नव्या भूमिकेत बघायला नक्कीच आवडेल. अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी कार्यरत असताना आपण आजतागायत जपलेले संविधानिक तत्व आयोगाचा कारभार बघतानाही काटेकोरपणे जपाल. सावध आणि सतर्क रहा.. अवतीभवती संविधानाचे मारेकरी आहेत..!” असा संदेशच त्यांनी वाघमारे यांच्यासाठी लिहिलेला आहे. त्यामुळे आता अंधारे यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी मुख्य सचिव यु. पी. एस. मदान यांची राज्य निवडणूक आयुक्त पदाची मुदत सप्टेंबर 2024 मध्ये संपली होती. तेव्हापासून राज्य निवडणूक आयुक्तपद रिक्त होते. या पदासाठी दिनेश वाघमारे यांच्यासह माजी मुख्य सचिव नितीन करीर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष राजीव जलोटा, वित्त आणि नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यात स्पर्धा होती. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीत राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार फडणवीस यांनी दावोस दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्तपदासाठी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना केली होती.





Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.