बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून सराफ दुकानावर दरोडा प्रकरण...
पळ काढण्याच्या तयारीत असणाऱ्या चोरट्यांना धाडस दाखवून प्रतिकार करत जमावाने दिला होता चोप...
जमावाच्या मारहाणीत दोन चोरटे झाले होते जखमी.. तर एकजण फरार...
जमावाच्या धाडसामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला...
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील 21 जानेवारी रोजी सायंकाळची घटना...
सराफ दुकानावर दरोड्याची घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद...
जमावाने चोप दिलेल्या दोघा चोरट्यांवर शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू...
मात्र चोरट्यांना चोप देणाऱ्या अज्ञात दहा ते पंधरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल..
थंडी जोर कमी होताच लिंबुच्या दरात झपाट्याने वाढ....गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला असून तापमानात वाढ झाली आहे यायचं परिणाम आता भाजीपाल्याचा दरात देखील पाहायला मिळत आहे थंडी कमी झाल्याने लिंबूच्या दरात झपाटयाने वाढ झाली आहे किरकोळ बाजारात 60 रुपये किलो दराने मिळणारा लिंबू 100 रुपये किलो दराने मिळत आहे
रायगड मध्ये ठाकरे सेनेला मिळणार मोठा धक्कामहाड मधील स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर
० स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या
० विधानसभेला ठाकरे सेनेकडून लढविली होती निवडणूक
० मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश
आठ दिवसांत शरद पवार आणि अजित पवार दुसऱ्यांदा एकत्रव्हीएसआयच्या कार्यक्रमात दोघांची आसनव्यवस्था शेजारी शेजारी
- आठ दिवसांपूर्वीच बारामतीत दोघे शेते कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात आले होते एकत्र
- तिथे दोघांची आसन व्यवस्था शेजारी नव्हती
- व्हीएसआयच्या कार्यक्रमात मात्र दोन्ही नेते शेजारी
- या दोघांच्या शेजारी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, विजयसिंह मोहीते पाटील यांची आसन व्यवस्था
अखेर गडकरींनी दिलेला अल्टिमेटम संपला... तरीही काम अपूर्णचं...- नागपूर विमानतळातील धावपट्टीच्या रीकार्पेटिंगचे 23 डिसेंबरला कामाची पाहणी करत गडकरीनी महिनाभराचा अल्टिमेटम दिला होता... पण अलटीनेटम संपूर्ण काम मात्र अपूर्ण आहे
- धावपट्टीच्या रीकार्पेटींचे काम साठ टक्केच पूर्ण झाले आहे... काम पूर्ण होण्यासाठी 31 मार्च पर्यंतची मुदत मिळावी अशी अपेक्षा रिकार्पेटिंगचे काम करणाऱ्या के.जी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची आहे...
Pune News: कात्रजमध्ये पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला मारणार; साडेतीन लाखाची रोकड लूटण्याचा प्रयत्नकात्रज-कोंढवा रस्त्यावर पेट्रोल पंपावरील कामगाराला धमकावून चोरट्यांनी त्याच्याकडील साडेतीन लाखांची रोकड लूटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीआहे.चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये कामगार जखमी झाला आहे.कात्रज कोढवा रोडवरील एम.के.एन्टरप्रायझेस इंडीयन पेट्रोल पंपावरील दिवसभराची जमा झालेली ३,४६,०००/- रुपये रोख रक्कम ही बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना अनोळखीन तीन मुलांनी त्यांना हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण व दुखापत करुन त्यांची बॅग जबरदस्तीने हिस्कावण्याचा प्रयत्न केला आहे.
कन्नड तालुक्यातील सायगव्हाण गावात मेडिकल चालकाला बेदम मारहाणऔषध विकत घेण्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण
मेडिकल चालकाला बेदम मारहाण करत मेडिकलचीही केली तोडफोड
मारहाण आणि तोंडफोडीचा सीसीटीव्ही आला समोर
तोडफोड करणाऱ्या आरोपीवर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बाहेरून येऊन गावात मेडिकल चालवत असल्यामुळे केली मारहाण
बंजारा समाजातील मेडिकल चालकाला उच्चवर्गीय समाजातील तरुणांकडून मारहाण
मारहाणीमुळे कन्नड तालुक्यात खळबळ
धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अखेर लागला मुहूर्तलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये सापडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अखेर मुहूर्त लागला आहे.नुतन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये 26 जानेवारी दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे.राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली 26 जानेवारी ला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Pune News: शेतकऱ्यांचा स्वप्नांचा चिखल, टोमॅटोने दर १०० रुपयांवरून ५ रुपयांवरटोमॅटोने केला शेतकऱ्यांचा स्वप्नांचा चिखल
पुण्याच्या बाजारात कवडीमोल भाव उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघेना
गेल्या वर्षी चांगली कमाई करून देणाऱ्या टोमॅटो ने यावर्षी शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे
गेल्या वर्षी 100 रुपयांपर्यंत टोमॅटोचा दर यंदा थेट 5 रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चिखल झाल
आवक वाढल्याने पुणे मार्केट यार्ड मधील बाजारात टोमॅटोचा ढीग लागत आहे
Pune News: पुण्यात थेट सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी हिसकावली महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेनपुण्यात थेट सोसायटीमध्ये जात चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोन्याची चेन
दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावली महिलेची सोन्याची चेन
पुण्यातील आणखी एक घटना सी सीटव्ही मध्ये कैद
पुण्यातील 24 तासात अशी दुसरी घटना.
थेट सोसायटीच्या पार्किंग मध्ये जात चोरट्यांचा प्रताप
पुण्यातील कर्वेनगर पाठोपाठ आता कोथरूड भागात सुद्धा समोर
Bhandara News: भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावर दुचाकीला अपघात, महिला गंभीर जखमीभंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराचा ब्रेकर आणि खड्ड्यांमुळे वाहनावरील ताबा जाऊन अपघात घडल्याची घटना घडली.
पुष्पा राजेश दुर्गे वय 37 राहणार भीमनगर नागपूर हे आपल्या पतीसोबत दुचाकीने नागपूर वरून कारधा येथे जात असताना हा अपघात झाला.
वैनगंगा नदीव पुलावर ब्रेकर आणि खड्ड्यांमुळे त्यांच्या मोटार सायकलचा ताबा सुटला आणि अपघात घडला.
दरम्यान पुष्पा दुर्गे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून जखमी महिलेला तत्काळ भंडारा जिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.