सध्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याने (Mahakumbh Mela 2025) जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हा महाकुंभमेळा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण या महाकुंभमेळ्याला भेट देत आहेत. तेथील वातावरणाचा आनंद घेत आहेत. देशविदेशातून येथे भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर देखील महाकुंभमेळ्यात सहभागी झाले आहेत.
अभिनेते खेर (Anupam Kher) यांनी प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला भेट दिली आहे. ते यात सहभागी झाले आहेत. त्याचा हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्यांनी गंगा स्नान करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडू कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तब्बल १४४ वर्षांनी जुळून आलाय योग जुळून आला आहे.
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते स्नान करताना दिसत आहेत. या व्हिडीओला त्यांनी एक खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "महाकुंभात गंगेत स्नान करून जीवन सफल झाले. गंगा, जमुना आणि सरस्वती माता जिथे पहिल्यांदा भेटतात तिथे पोहोचलो. प्रार्थना करताना डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.योगायोग बघा बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठादिनी असेच झाले होते.सनातन धर्म की जय..."
अनुपम खेर यांनी महाकुंभमेळ्यात प्रवेश करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी लिहिलं की, "मी महाकुंभाच्या पवित्र ठिकाणी पोहोचलो. हे एक जादूचे शहर आहे. येथील वातावरण येथे आल्यावरच अनुभवता येते. सर्वत्र उन्माद, भक्ती, जिज्ञासा, प्रश्नांची उत्तरे, अध्यात्मिक उत्सव आहे. स्वामी अवधेशानंद गिरीजी महाराज यांचा माझ्याबद्दलचा स्नेह आणि आदर यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवून सनातनचे ज्ञान प्राप्त करणे हे माझे भाग्य आहे. हर हर महादेव!"