सर्वात कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या बँका कोणत्या? परवडणाऱ्या दरात मिळते का कर्ज?
Marathi January 24, 2025 02:25 AM

Bank Loan News : अनेकदा आपल्याला अचानक पैशांची गरज लागते. अशा वेळेस आपण बँकांकडून कर्ज घेतो. मात्र, कर्ज घेताना ज्या बँका कमी व्याजदरात कर्ज देतात, त्यांच्याकडूनच कर्ज घेणं गरजेचं आहे. दरम्यान, तुम्हाला सर्वात स्वस्तात वैयक्तिक कर्ज देणाऱ्या बँका माहित आहेत का? या बँका किती व्याजदराने कर्ज देतात? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बाजारातील अनेक बँका आकर्षक व्याजदरावर वैयक्तिक कर्ज देत आहेत. जाणून घेऊयात परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्जपुरवठा करणाऱ्या पाच बँकांची माहिती.  

HDFC बँक

HDFC बँक 10.85 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देत आहे. ज्या ग्राहकांना कमी EMI सह कर्जाची परतफेड करायची आहे त्यांच्यासाठी हा दर आकर्षक आहे.

ICICI बँक 

ICICI बँक 10.85 टक्के या दराने वैयक्तिक कर्ज देते. ही बँक तिच्या जलद प्रक्रिया आणि उत्तम ग्राहक सेवेसाठी ओळखली जाते.

इंडियन बँक

 इंडियन बँक ही 10.85 टक्के ते 16.10 टक्के व्याजदराने कर्ज देत आहे. सरकारी बँक असल्याने ग्राहकांसाठी ती एक विश्वासार्ह पर्याय आहे.

कॅनरा बँक

 कॅनरा बँकेचा व्याजदर हा 10.95 टक्के ते 16.40 टक्क्यांपर्यंत आहे. ही बँक तिच्या जलद प्रक्रिया आणि उत्तम ग्राहक सेवेसाठी ओळखली जाते.

IDFC बँक

IDFC बँक ही 10.99 टक्के ते 23.99 टक्के व्याज दराने वैयक्तिक कर्ज देत आहे. त्याचे दर थोडे जास्त असले तरी ही बँक लवचिक पेमेंट पर्याय देते.

महत्वाच्या बातम्या:

Zomato Share Price :झोमॅटोचा शेअर गडगडला, तीन दिवसांमध्ये 44620 कोटी बुडाले, पुढं काय, तज्ज्ञ काय म्हणाले?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.