दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) सध्या खूप काळापासून चर्चेत आहेत. सध्या राम गोपाल वर्मा कोर्टकचेरीमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत. सात वर्षे जुन्या खटल्याबाबत न्यायालयाने राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सविस्तर प्रकरण जाणून घ्या.
सध्या गोपाल वर्मा कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील न्यायालयाने 7 वर्ष जुन्या चेक बाऊन्स प्रकरणावर सुनावणी करताना राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा आणि दंड ठोठावला आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान राम गोपाल वर्मा न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांत तक्रारदाराला 3 लाख 72 हजार 219 रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे.
राम गोपाल वर्मा यांनी दिलेला दंड भरला नाही तर, त्यांना तीन महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले जाणार आहे. राम गोपाल वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम 131 अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. अशाप्रकारे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना 'सिंडिकेट'चित्रपटाची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी मुंबईतील न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात दोषी ठरवले. कायदेशीर कारवाईच्या वादात राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. राम गोपाल वर्माचा 'सिंडिकेट' येणार आहे.
राम गोपाल वर्मा यांच्यावर श्री नावाच्या एका कंपनीने महेशचंद्र मिश्रा यांच्यामार्फत चेक बाऊन्सचा खटला दाखल केला होता. ही घटना २०१८ मध्ये घडली. या प्रकरणात राम गोपाल वर्मा यांनी २०२२ मध्ये न्यायालयात ५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. आता पुन्हा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाच्या दंडामुळे राम गोपाल वर्मा अडचणीत आले आहेत.