Maharashtra News Live Updates: भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावर दुचाकीला अपघात, महिला गंभीर जखमी
Saam TV January 23, 2025 09:45 PM
Bhandara News: भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावर दुचाकीला अपघात, महिला गंभीर जखमी

भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलावरून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराचा ब्रेकर आणि खड्ड्यांमुळे वाहनावरील ताबा जाऊन अपघात घडल्याची घटना घडली.

पुष्पा राजेश दुर्गे वय 37 राहणार भीमनगर नागपूर हे आपल्या पतीसोबत दुचाकीने नागपूर वरून कारधा येथे जात असताना हा अपघात झाला.

वैनगंगा नदीव पुलावर ब्रेकर आणि खड्ड्यांमुळे त्यांच्या मोटार सायकलचा ताबा सुटला आणि अपघात घडला.

दरम्यान पुष्पा दुर्गे यांना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून जखमी महिलेला तत्काळ भंडारा जिल्हा रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.